सास्ती येथे हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात.

Mahawani


शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन. 

महावाणी - विरेंद्र पुणेकर
२३ जानेवारी २४

राजुरा : हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा सास्ती च्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ब्रिलियंट कॉन्व्हेंट सास्ती येथे चित्रकला स्पर्धा व जिल्हा परिषद शाळा सास्ती येथे निबंध स्पर्धा घेण्यात आली. चित्रकला स्पर्धेमध्ये वनकर मॅडम, समुदाय आरोग्य अधिकारी सास्ती यांच्या निरीक्षणात स्पर्धेचे विजेते ठरवण्यात आले. यात प्रथम क्रमांक आरुष संतोष उपरे, द्वितीय क्रमांक दीक्षता टुडेटी, तृतीय क्रमांक प्रियांशू देवानंद लांडे हे विजेते राहीले. आणि  निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कार्तिक धोटे, द्वितीय क्रमांक भूमी चौधरी, तृतीय क्रमांक चैतन्य वराटे हे विजेते ठरले.

    श्री. रमेशभाऊ पेटकर उपतालुका प्रमुख राजुरा तथा माजी ग्रामपंचायत सरपंच सास्ती यांच्या नेतृत्वामध्ये ही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रकाश  भटारकर, युवा सेना तालुका चिटणीस प्रवीण भाऊ पेटकर, रवी दुवासी, बालाजी लांडे, विलास भटारकर, सचिन पेटकर, बापूजी इटनकर, दिलीप बुटले, माया भटारकर, विजयाताई दुवासी, अंकुश बुटले, सौरव चन्ने, हर्षल पेटकर, रोहित पवनकर, योगेश पेटकर, संदीप पेटकर, अमित भटारकर, यासह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तालुका शाखा, युवा सेना, महिला आघाडी शाखा सास्ती चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Balasaheb Thackeray Jayanti Enthusiasm.) (sasti) (rajura) (mahawani)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top