शहरातील पशुचिकित्सालयाच्या दुरावस्थेबाबत आम आदमी पक्षाचे फेसबुक लाईव्ह



महावाणी - विरेंद्र पुणेकर
२१ डिसेंबर २३

            बल्लारपूर : अनेक वर्षांपासून शहरातील पशुचिकित्सालय समस्यांनीग्रस्त आहे. या चिकित्सालयात शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही, उपचारासाठी येणार्‍या जनावरांसाठी पाण्याची सोय नाही, 2019 पासून वीज खंडित आहे, स्वच्छतेचा अभाव आहे. पशुचिकित्सालया समोरिल बनलेल्या रोडमुळे पावसाळ्यातील दिवसात परिसरात पाणी साचून चिखल साचलेला असतो.याकडे आम आदमी पक्षाचे शहर संघठनमंत्री रोहित जंगमवार ( Rohit Jangamwar ) यांनी यापूर्वीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी नवीन वीज मीटर लागेपर्यंत तात्पुरती वीज कनेक्शन करून देणार तसेच पावसाळ्यात चिखलाची समस्या दुर व्हावी यासाठी मातीचे भरण टाकण्याची व्यवस्था केली जाईल असे लिखित आश्वासन दिले. परंतु तीन-चार महिने लोटल्यानंतर देखील कोणतेही ठोस पाऊल उचलले न गेल्याने काल पुन्हा नवनियुक्त गटविकास अधिकारी बोबडे साहब ( Group Development Officer Bobde Sahab ) यांची भेट घेऊन पक्षाच्या शिष्टमंडळाने समस्यांबाबत माहिती दिली व आज शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार ( City President Ravikumar Puppalwar ) यांच्या नेतृत्वात तसेच जिल्हा संघठन मंत्री नागेश्वर गंडलेवार ( Minister Nageshwar Gandlewar ) यांच्या प्रमुख उपस्थित पक्षाच्या शिष्टमंडळाने फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून समस्यांनी ग्रस्त पशुचिकित्सालयाची अवस्था जनतेपुढे उजागर केली.

        पक्षाच्या या निरिक्षण मोहिमेदरम्यान  हे दिसून आले कि पक्षाच्या पाठपुराव्यामुळे चिकित्सालयाची तुटलेली मागील बाजूची भिंत बनविण्यात आली. तसेच पक्षाने यापुर्वी केलेल्या निरिक्षणात चिकित्सालयाच्या नावाचा बोर्ड लावण्याची मागणी केली होती, हि मागणी पूर्णत्वास आल्याचे दिसून आले. यावेळेस शहर सचिव ज्योतिताई बाबरे, उपाध्यक्ष गणेश सिलगमवार व अफजल अली, संगठनमंत्री रोहित जंगमवार, युथ अध्यक्ष सागर कांबळे, महिला उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी, प्रणय नगराळे ( City Secretary Jyoti Tai Babare, Vice President Ganesh Silgamwar and Afzal Ali, Organization Minister Rohit Jangamwar, Youth President Sagar Kamble, Women Vice President Salma Siddiqui, Pranay Nagarle ) इत्यादि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ( mahawani ) ( ballarpur )( aam aadmi party )

To Top