गोवरी-बाबापुर क्षेत्रात "वाघाची" दहशत.

 


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१२ डिसेंबर २३

           राजुरा : तालुक्यातील बाबापूर- मानोली (बु.) गाव शिवारात "वाघाच्या" वावराणे संपूर्ण गाववाशी, वाहतूक कर्ते अत्यंत भयभीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. बाबापुर मानोली (बु.) हे गाव चोही कडून "वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड" (WCL) ने व्यापले असून वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड च्या मोठ-मोठ्या मातीच्या ढिगारावर मोठ्या प्रमाणात जंगल उगले आहे. व त्या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आहे. याचीच चाहूल पाहत वाघाणे सदर क्षेत्रात शिरकाव केला असावा. परंतु आज तो "वाघ" वाहतूक करते, सदर क्षेत्रात काम करणारे कामगार, गुरे चरण्या करीता नेणाऱ्या गुरख्यानां समोरा-समोर आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

            बाबापुर येथून जाणारा मार्ग हा चंद्रपूरला जुडत असल्याने सदर मार्गाने ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणात आहे परंतु वाघाच्या दहशतीने सदर मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहतूक कर्त्यांनी स्वतःचा मार्गच बदलला आहे. वाघाच्या दहशतीने गावातून दिवसा-रात्रौ ये-जा करण्याचे गावकऱ्यांनी मोठया प्रमाणात टाळल्याचे दिसून येत आहे. सदर बाबी ची माहिती संबंधीत "वन विभागाला" देऊन हि सदर विभागा मार्फत कुठलीही उपाय योजना केली जात नाही असे गावकऱ्यातून बोलले जात आहे. आज रुपेश मिलमिले (बाबापूर) यांच्या गाईला वाघाने जबर दुखापत केली आहे. तसेच ८ डिसेंबर रोजी गुलाब रासेकर मानोली (बु.) याच्या गाईला सदर वाघाणे आपल्या आहारात घेतल्याने गावकरी आपल्या गुरांना बाहेर चरण्या करीत नेण्याचे टाळत आहे. 

            जो पर्यंत वाघाला जेल बंद करण्यात येत नाही तो पर्यंत आम्ही व आमच्या गुरांना बाहेर चरण्या करीत नेणार नाही असे गाव वासियांतून बोलले जात आहे. तरी संबंधीत वन विभागाने सदर बाबीची दक्षता घेत त्वरित सदर "वाघा" ला जेल बंद नकेल्यास आम्ही गाववासी आमच्या चमूने सदर "वाघाला धडा शिकवू" असा संतप्त गावकऱ्या कडून राजुरा वन विभागाला इशारा ( Forest Department Rajura ) ( Terror of the tiger ) ( babapur ) ( manoli bk ) 


बघा व्हिडीओ









To Top