योग्य विचारांना आत्मसात करा - कृतिका सोनटक्के

 नेफडो व सोनिया गांधी पब्लिक स्कुल चा संयुक्त कार्यक्रम. 

भीमगित गायन व वक्तृत्व स्पर्धा संपन्न.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
6 डिसेंबर 23

        राजुरा : नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा व सोनिया गांधी पब्लिक स्कुल राजुरा च्या संयुक्त विद्यमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्य भीम गीत गायन स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या तथा नेफडो च्या राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समिती राजुरा तालुका अध्यक्षा कृतिका सोनटक्के यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्ह्णून रजनी शर्मा, नागपूर विभाग अध्यक्षा, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सोनिया गांधी कॉन्व्हेंट च्या मुख्याध्यापिका शबनम शेख, उप प्राचार्या रफत शेख, शिक्षक श्रीराम कुईटे आदींची उपस्थिती होती. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी भीम गीत गायन व वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. यात गीत गायन मध्ये इयत्ता सहावीच्या धानी पुणेकर व संच यांचा प्रथम क्रमांक आला तर वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता आठवीची विद्यार्थ्यांनी नंदिनी मोरे हिचा प्रथम क्रमांक आला. क्रमांकप्राप्त विध्यार्थीना नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थे तर्फे भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका जया महेर यांनी केले. प्रास्ताविक संगीता रागीट यांनी तर आभार सुवर्णा बारेकर यांनी केले. शिक्षिका प्रिया कांबळे व अंकिता वनकर यांनी भीम गीत गायन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सोनिया गांधी शाळेच्या शिक्षिका प्रेमीला रोगे, वंदना मेडपल्लीवार, लीना गुरू, विद्या आकनूरवार, नीता ब्राम्हणे, पल्लवी आदे, श्रुती सातपुते, प्राची चौधरी, प्रशिणी निरांजने, राणी ठमके आदींसह शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम केले.

        क्रांतिकारक, समाजसुधारक, देश सेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे महान व्यक्तींच्या विचारांवर आपण मार्गक्रमण करीत योग्य विचारांना आत्मसात केले पाहिजे. महामानवाचे जीवन चरित्र वाचून समाजात एकतेचा, समतेचा संदेश दिला पाहिजेत असे  कृतिका सोनटक्के यांनी मत व्यक्त केले. A joint program of NEFDO and Sonia Gandhi Public School. ) ( mahawani ) ( rajura ) ( badal bele )

To Top