आत्ता होणार राजुरात बॅनर्सवर कार्यवाही

Mahawani


राजुरा नगर परिषद क्षेत्रामध्ये होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स लावण्यासाठी दररोज दिल्या जाणाऱ्या परवाग्यांची जागा निश्चित

महावाणी - विरेंद्र पुणेकर
२८ डिसेंबर २३

राजुरा : आम आदमी पार्टी, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष व जय भवानी कामगार संघटना अध्यक्ष मा. सुरजभाऊ ठाकरे यांचा राजुरा वासियांना नगर परिषदेने नेमून दिलेल्याच जागेवर होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स लावावे अन्यथा अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स वर कार्यवाही करण्याचा इशारा 

           राजुरातील प्रत्येक चौकात, गल्लीत, मार्गावर होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स लागलेले पाहायला मिळत आहे. होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्सने संपूर्ण राजुरा नगरी गजबजलेली पाहायला मिळत असून होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स बाजी विना राजुरातील एकही चौक, गल्ली व मुख्य मार्ग उरलेले नाही. परंतु मा. सुरज ठाकरे यांच्या माहिती अधिकाराच्या अर्जात समोर आलेल्या माहिती नुसार नगरपरिषद राजुरा यांनी नगर परिषद क्षेत्रामध्ये होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स लावण्यासाठी ८  स्थळ नेमून दिले असून देखील बॅनर बाजी कर्त्यांनी शहरातील एकही कोपरा खाली सोडला नाही आज प्रत्येक पाऊला-पाऊलावर मोठ्या प्रमाणात लागलेल्या होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स पाहायला मिळतात. यात जनजागृती, जनते करिता असलेली माहिती फलक बॅनर्स आळ लपल्याने नागरिकांच्या समोर फक्त नेत्यांचेच चित्र आहे.

            दि. 22/11/2022 ला झालेल्या सर्वसाधारण सभा ठराव क.11 ची सत्यप्रत ठराव क्रः-11 मा. उपसचिव महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग शासन निर्णय क्र. याचिका- 3017/प्र.क्र. 130/नवि-22 मंत्रालय मुंबई - 400032 दि. 14 नोव्हेंबर 2022 अन्वये नगर परिषद क्षेत्रामध्ये होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी तात्पुरत्या जाहीराती लावण्यासाठी जागा निश्चित करण्याचे व त्यास व्यापक प्रसिध्दी देण्याचे आदेश केलेले आहे. सदरील माहीती मा. आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांना 2 आठवडयाच्या आत सादर करणे बाबत आदेशीत केलेले आहे. सदरील आदेशानुसार राजुरा नगरपरिषद क्षेत्रात जाहीराती/ होर्डिंग इत्यादी बाबत दररोज दिल्या जाणा-या परवाग्यांची जागा खालील प्रमाणे निश्चित करण्याबाबत चर्चेअंती प्रत्येक ठिकाणावर 5 बॅनरची परवानगी देण्याकरिता ठरविण्यात येते. ।. बल्लारशा- राजुरा टर्निंग पॉईट, 2. बस स्टॅन्ड (नविन ) समोर, 3. विश्राम गृहा समोरील जागेवर, 4. जुना बस स्टॅन्ड, 5. पंचायत समिती चौक, 6. कर्नल चौक, 7. रेल्वे फाटक व शिवाजी कॉलेच टर्निंग, 8. नाका नं. 3 सदर स्थळा वेत्रिक्त नगर परिषद क्षेत्रामध्ये होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स लावण्यात आल्यास कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले आहे. (  Action will be taken on Rajurat banners now ) ( mahawani ) ( rajura ) ( nagar parishad rajura ) ( suraj Thakre )

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top