खुल्या वक्तृत्व स्पर्धेत चंद्रपूरचा प्रलय ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी



महावाणी - विरेंद्र पुणेकर
२८ नोव्हेंबर २३

          चंद्रपूर:  संविधान संवर्धन समिती, भद्रावती यांच्या तर्फे भारतीय संविधान दिना निमित्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक भद्रावती येथे भव्य खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजंन करण्यात आले होते.

      भारतीय संविधान आणि आजची राजकीय परिस्थिती हा स्पर्धेचा प्रमुख विषय होता ज्यात जवळपास चाळीस स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता त्यात सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेले कुमार. प्रलय शाम म्हशाखेत्री ( Pralay Sham Mhsakhetri ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय पारितोषिक संविधान अवथाडे, तर प्रेम नामदेव जरपोतवार यांनी आपले अभ्यासू वकृत्व मांडत तृतीय पारितोषिक पटकाविला.

      या वेळी मा. तुषार उमाळे सर बोलत होते "प्रलय" नक्कीच समोरील जीवनात आपल्या अभ्यासू वक्तृत्व व्याख्यनातून लोकांच्या जीवनात प्रबोधनात्मक "प्रलय" आणणार आणि युवकांना प्रेरणादायी युवक ठरेल.

        मुख्य प्रबोधनाच्या कार्यक्रमात बक्षिस वितरण सोहळा पार पडला ज्यात प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते मा. तुषार उमाळे  ( tushar umale ) यांच्या हस्ते पारितषिक वितरण करण्यात आले.  

            या वेळी प्रलय आपल्या यशाचे श्रेय शिक्षक, आई, वडील व मित्रपरिवाराला देत कार्यक्रमाची सांगता केली.  ( mahawani ) ( bhadrawati ) ( chandrapur ) ( Oratorical competition )

To Top