भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका संविधान दिन व धम्म प्रवचन मालिका तथा सत्कार समारोप संपन्न.



महावाणी - विरेंद्र पुणेकर
२७ नोव्हेंबर २३

           दि. २६ रोज सकाळी 11.30 वाजता संविधान चौक राजुरा महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला भारतीय बौद्ध महासभेतील पदाधिकाऱ्या तर्फे मानवंदना देण्यात आल्या. त्रिशरण पंचशील ग्रहण करत संविधान प्रस्ताविकेचे वाचन आयु. नी.गीताताई पथाडे व किरण ताई खैरे यांनी केले. संविधान चौक ते बुध्द भूमी  पर्यंत मिरवणूक  काढत विश्राम गृह समोर स्थीठ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मानवंदना करण्यात आले. तसेच दुपारी १:०० ला यंग मेन्स बुदिस्ट्ट वेलफेअर असोशीयन, राजुरा येथील बुध्द विहार ( Young Men's Buddhist Welfare Association Buddha Vihara at Rajura ) इथे संविधान दिना निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आल. 

तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार, दीप  प्रज्वलित करण्यात आले. व सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करीत संविधान प्रस्ताविकेचे वाचन आयु.नी. रत्नमाला मावलीकर यांचा हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आयु. भिमराव खोब्रागडे उपाध्यक्ष यांनी संविधान वर अध्यक्षीय भाषण केले तर आयु.सिद्धार्थ पथाडे सामाजिक कार्यकर्ता, यांनी उद्घाघाटन करून डॉ.बाबासाहेब यांनी लिहिलेले संविधान बद्दल भारतीय संविधान आणि आजची वर्तमान स्थिती या विषयावर अर्धा तास मार्गदर्शन केले आयुष्यमती. समताताई लभाने केंद्रीय शिक्षिका बल्लारपूर यांनी राजुरा तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्यामध्ये रमाई जयंती, समाज प्रबोधन, उपासीका शिबीर बामणवाडा,  सतत विस दिवस शिबिराला मार्गदर्शन केलेले आहे. आणि आज सांविधाना बाबत बोलतांना त्या म्हणाल्या की, आज विवाह नन्तर दोन भांवाना एका घरात राहणे अवघड जाते परंतु भारताचे संविधान  29 राज्य, 10 धर्म, 7500 जाती, 3000 भाषा, 45 कोटी कुटुंब,  136 कोटी लोकसंख्या आणि यांना 73 वर्षlपासुन सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र बांधून ठेवूनारे हे संविधान आहे. संविधानावर भारत देश चालत आहे जगामध्ये भारताचे संविधान सर्व्श्रेस्थ मानले जाते अगदी सध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले. 

प्रा. विठ्ठल आत्राम शिवाजी कालेज राजुरा, आद. किसन बावणे शिक्षक जिल्हा परिषद जिवती, यांनी सुद्धा संविधान वर सविस्तर मार्गदर्शन केले. आयु. नी. गीताताई पथाडे माजी उपाध्यक्ष नगर परिषद राजुरा, आयु.नी. किरणताई खैरे शहर कोष्याध्यक्ष, सुजाताताई नले सरचिटणीस, आयु. अशोक दुबे अध्यक्ष ग्राम शाखा रामपुर सर, आयु. मुरलीधर ताकसांडे उपाध्यक्ष, आयु.प्रा. दिनेश घागरगुंडे उपाध्यक्ष, आयु. बंडू वनकर संघटक वरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. या पूर्वी सतत चार महिने वर्षवास प्रवचन मालिका घेण्यात आले त्या नंतर समारोपीय कार्यक्रमात राजुरा तालुक्यातील सर्व विहारात प्रा. दिनेश घागरगुंडे, राजहंस पिपरे, धनराज दुर्योधन, किरणताई खैरे, निर्मलाताई खैरकर यांनी आपले थोडक्यात मनोगत वक्त केले. व भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्यामध्ये बौध्द धमाच्या प्रचार-प्रसार करण्याकरिता मदत केली तशेच पत्रकार अमोल राऊत, चंदन जगताप, हनिषा दुधे आणि सामाजिक चळवळी मधील कार्यकर्ताना सन्मान चिन्ह देऊन भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्याच्या पदाधिकारी यांच्या कडून सम्मानित  करण्यात आले. 

विशेष उपस्थिती आयु. धर्मुजी नगराळे अध्यक्ष, गौतम चौरे सरचिटणीस, गौतम देवगडे कोष्याध्यक्ष, प्रभाकर लोखंडे, समता सैनिक दलाचे सैनिक वैभव नले, यश वाघमारे, साक्षी नले, शुभम नगराळे, व इतर सैनिकानीं उत्तम सेवा दिली.  कार्यक्रमाचे स्वागत गीत आयु. अशोक दुबे अध्यक्ष ग्राम शाखा रामपुर यांनी केले तर मनोगत नंतर आयु. विजय खैरकर यांनी संविधान गीत सुंदर आवाजा मध्ये गायले. तर या कार्यक्रमाची प्रास्ताविक आयु. पुरुषोत्तम वनकर अध्यक्ष ग्राम शाखा गोयेगावं यांनी  केले आणि उत्कृष्ट संचालन आयु. इंजी. राहुल भगत अध्यक्ष ग्राम शाखा गोवरी यानी केले तर आभार प्रदर्शन आयु.नी. वंदनाताई देवगडे यांनी केले. आद. सुरेश मेश्राम सामाजिक कार्यकर्ताचा मुलगा सुधीर मेश्राम व महेश्ररी मेश्राम यांच्या मुलांच्या नामकरण विधी करून मुलाचे नाव सुवेन ठेवण्यात आले.  या प्रसंगी अल्पउपहार देण्यात आला.  कार्यक्रमाला राजुरा तालुक्यातील उपासक, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. ( mahawani ) ( constitution day and dhamma discourse series ) ( rajura )

To Top