भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा धोपटाळा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समरोपिय कार्यक्रम संपन्न.



महावाणी - विरेंद्र पुणेकर 
२९ ऑक्टोबर २३

  राजुरा: काल शनीवार ला धोपटाळा कॉलनी येथे भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा धोपटाळा कॉलनी,सार्वजनिक पंचशील मंडळ,प्रबोधनी उपासीका संघ

च्या संयुक्त विद्यमाने "वर्षावास धम्म प्रवचन मालिका" चा समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाची शुरुआत तथागत बुद्धांच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प मालार्पण व धूप, दिप प्रज्वलित करून,सामुहिक  त्रिशरण व पंचशील घेण्यात आले.त्यानंतर स्वागत गीत घेऊन मान्यवराना पुष्प गुच्छ देवून  स्वागत करण्यात आले.

    या कार्यक्रमांमध्ये भारतीय बौद्ध महासभा चे पदाधिकारी आयु.किशोर तेलतुंबडे केंद्रीय शिक्षक,के.एल.गजभिये,आयु. धरमुजी नगराळे, दिवाकर जनबंधू ,आयु.नी.उर्मिला जनबंधू,शीतल ब्राम्हने या

 प्रत्येक मार्गदर्शकांनी धम्माची गरज पटवून दिली. तसेंच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीने विज्ञानवादी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर केला जातो, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विविध शिबिराचे आयोजन करावे, विविध उपक्रमाचे नियोजन करावे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संस्थेचे काम प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवावे अशी आव्हाने प्रत्येकाने मांडले.

यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमांमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने घेण्यात आलेल्या धोपटाळा कॉलनी राजुरा तालुका मध्ये वर्षावास धम्म प्रवचन मालिकेमध्ये धम्माच्या प्रचार व प्रसार करून उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल आयु.किशोर तेलतुंबडे केंद्रीय शिक्षक,के. एल.गजभिये, आयु. धर्मुजी नगराळे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा राजुरा तालुका यांचा सत्कार व सन्मान चिन्ह देऊन भा बौ म.ग्रामशाखा,सार्वजनिक पंचशील मंडळ,प्रबोधनी उपासीका संघ धोपटाळा कॉलनी च्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख.    उपस्थिती आद.गौतम देवगडे,भीमराव    खोब्रागडे,अशोक धोटे, भैसारे  सर,उतम रामटेके,आयु.नी.रिता सुखदेव आयु नि. सुजाताताई नळे केंद्रीय शिक्षिका प्रामुख्याने  उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु.नी शीतलताई ब्राम्हने यानी केले तसेच उत्कृष्ट संचालन आयु.शैलेश पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु.नी.स्नेहाताई सागोडे यांनी केले. 

या कार्यक्रमाला राजुरा तालुक्यातून आणि धोपटाळा सास्ती कॉलनी येतील बौद्ध बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती नंतर सरण्यत्र. घेवून कार्यक्रम समाप्त झाला.त्यानंतर भोजन दान झाले.

To Top