रेशनकार्ड समस्या आणि नागरिकांमधील प्लास्टिक तांदळाचा संभ्रम दूर करण्याचा आम आदमी पार्टी बल्लारपूर तर्फे प्रयत्न.

Mahawani




महावाणी - विरेंद्र पुणेकर
२८ ऑक्टोबर २३

        बल्लारपूर: 27 ऑक्टोबर 2023 रोजी शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार जी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार डॉ. कांचन जगताप जी यांची भेट घेऊन त्यांना कळविण्यात आले की शहरातील जनता रेशनमध्ये प्लास्टिकचे तांदूळ असल्याच्या भीतीने संभ्रमात व चिंतेत आहे. नवीन अन्नधान्य शिधापत्रिका बनवणे, रेशन अचानक बंद करणे, नाव अपडेट करणे, रेशन कार्डवर अक्टिव्हेट करणे अशा अनेक समस्या घेऊन तहसील कार्यालयात येणाऱ्या लोकांना कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे अगदी तुटपुंज्या समस्यांसाठीही तहसील कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागतात, रेशन अनियमितता दूर करावी व रेशन दुकानदारांनी ग्राहकांना धान्य दिल्यानंतर नियमितपणे पावती द्यावी, व प्रत्येक रेशन दुकानावर संपूर्ण माहिती असलेले फलक लावण्याची मागणी करण्यात आली. तहसीलदार मैडमकडून मिळालेल्या माहितीनुसार प्लास्टिकचा तांदूळ समजला जाणारा तांदूळ 'फोर्टिफाइड राईस' आहे. या तांदळात सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. तरी याला प्लास्टिकचा तांदूळ समजून भिती बाळगण्याचे कारण नाही असे तहसीलदार मॅडम नी स्पष्ट केले.तहसीलदार डॉ.कांचन जगताप यांनी सर्व समस्या विचारात घेऊन लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

        यावेळी शहर अध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार जी, उपाध्यक्ष अफजल अली जी, सचिव ज्योतीताई बाबरे, संघटन मंत्री रोहित जंगमवार , प्रवक्ता आसिफ हुसैन शेख, सहसचिव आशिष गेडाम आदी उपस्थित होते. ( Ration card issue plastic rice confusion ) ( mahawani ) ( aap ) ( ballarpur )

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top