शेतकरी मित्र रमेश पंडित यांची राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कारासाठी निवड


महाराष्ट्र राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री मा. ना. राधाकृष्णजी विखे-पाटील यांचे हस्ते पुरस्कार वितरण.


गजानन लांडगे - महावाणी प्रतिनिधी महागाव, यवतमाळ
०३ सप्टेंबर २३

    सहकाराचे जनक सहकारातुन शेतक-यांना समृद्धी मार्गाकडे नेणारे सहकार महर्षी "पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील" Padmashri Dr. Vitthalrao Vikhe Patil यांच्या जयंती निमित्ताने व शेतकरी दिनाचे औचित्य साधुन. रविवार 3 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षागृह Auditorium नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर - नांदेड येथे आयोजीत "शेतकरी सन्मान सोहळ्यात" शेतकरी मार्गदर्शक - शेतकरी मित्र ( Farmer's Friend ) - कृषीरत्न पुरस्कारासाठी "हरित क्रांतीचे प्रणेते - माजी मुख्यमंत्री कै.वसंतरावजी नाईक ( Former Chief Minister K.Vasanta Raoji Naik )-साहेब" यांची जन्मभुमी Pusad पुसद, श्रीरामपुर सोनार समाज सुपुत्र रमेश पंडित यांची निवड झाली आहे.

    "पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे ( Dr. Vitthalrao Vikhe ) -पाटील कृषी परिषद" प्रदेशाध्यक्ष "श्री.भागवत देवसरकर-साहेब" यांचे नियोजनात हा शेतकरी सन्मान सोहळा संपन्न होणार आहे, या सोहळ्यास मा.श्रीमती सुर्यकांताताई पाटील (मा.ग्रामविकास राज्यमंत्री - भारत सरकार), श्री.प्रताप पाटील चिखलीकर (खासदार - नांदेड), श्री.हेमंत पाटील (खासदार - हिंगोली), श्री.राम पाटील रातोळीकर (आमदार विधान परिषद), श्री.बालाजी कल्याणकर (आमदार - नांदेड), श्री.तुषार राठोड (आमदार - मुखेड), श्री.भिमराव केराम (आमदार - किनवट), श्री.राजेश पवार (आमदार - नायगाव), श्री.नामदेवराव ससाणे (आमदार - उमरखेड) तसेच डाॅ.इंद्रमणी मिश्रा (कुलगुरू - कृषी विद्यापीठ, परभणी), डाॅ.नितीन पाटील (कुलगुरु - पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर) व श्री.अभिजीत राऊत (जिल्हाधिकारी - नांदेड) उपस्थित असणार आहे.

कृषीरत्न. शेतकरी मित्र. रमेश पंडित यांचे मनोगत

    राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार निवड शेतकरी मित्राचे मनोगत. रमेश नंदकुमार पंडित Ramesh Nandkumar Pandit ,  श्रीरामपुर समाजसेवेची आवड - उच्च शिक्षीत, कृषी पदवि प्राप्त शासकीय नौकरीचा योग आला नाही व व्यवसायासाठी पुरेसे भांडवल नसल्याने  जगाचा पोशींदा अन्नदाता बळीराजाची सेवा करण्यासाठी खाजगी कृषी कंपनी मार्केटिंग क्षेत्रात मागील 19 वर्षे पासुन कार्यरत आहे आधुनिक बि-बियाणे, खते, औषधी यांची शेतकरी बांधवांना माहिती देऊन. कमी क्षेत्रात अधिक उत्पादन कसे वाढवता येईल याचे यशस्वी मार्गदर्शन करण्याचा व शेतकरी बांधव तसेच काळ्यामातीची सेवा करण्याचा योग आला. यातुनच माझे व माझ्या परिवाराचे उदरनिर्वाह भागत गेला सोशल मीडिया तसेच युट्युब चे माध्यमातुन शेतकरी बांधवांचे प्रत्यक्ष शेतात - बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे स्वार्थातुन परमार्थ साधन्याचे माझे अविरत कार्य सुरु आहे.

    तसेच भारतीय जनता पक्षाचे "भाजपा किसान मोर्चा"(BJP Kisan Morcha Yavatmal) यवतमाळ "जिल्हा सचीव" पदभार आहे, त्यामाध्यमातुन शेतक-यांच्या शासन दरबारी समस्या सोडविण्यात सदैव सक्रिय आहे, सध्या मी वसंत बायोटेक, Vasant Biotech  पुसद येथे कार्यरत आहे. 

    हरित क्रांती ची लाट कधीच थांबु नये. शेती आणि शेतकरी जगला तरच आपण जगु यावर माझा ठाम विश्वास आहे कृषीरत्न पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी वाढली आहे, कारण "पुरस्कार प्रेरणा देतात व प्रेरणेने राष्ट्र मोठे" यासाठी मी बांधील आहे ( Selection of Farmer Friend Ramesh Pandit for State Level Krishi Ratna Award ) ( Mahawani )

To Top