बल्लारपूर पोलिस स्थानक आयोजित शांतता समिती बैठकीतून डवळून स्थानिक पत्रकारांचा अपमान.


शांतता समिती बैठकीत स्थानिक पत्रकारांचा जाणीवपूर्वक अपमान !महावाणी - विरेंद्र पुणेकर
०२ सप्टेंबर २३

    बल्लारपूर: आगामी सन, सोहळा, उत्सव निमित्त शांतता समिती बैठक बल्लारपूर पोलिस स्थानक शुक्रवार ०१ सप्टेंबरला संपन्न झाली. नियमाप्रमाणे या बैठकीत शहरातील व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि पत्रकारांचा समावेश असतो. मात्र, यंदाच्या या शांतता समितीच्या बैठकीत शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मात्र, या वर्षी झालेल्या शांतता समिती बैठकीत प्रथमच पत्रकारांना डावळण्यात आले. 

    सन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण असणाऱ्या या बैठकीत स्थानिक पत्रकारांना डावळल्यामुळे  उपस्थित मंडळीही काही वेळासाठी अचंबित झाली. कि प्रती वर्षी शांतता बैठकीत स्थानिक पत्रकारांची उपस्थितिथी असते परंतु या वर्षी बैठकीतून डावळण्याचे नेमक कारण काय ? असा प्रश्न बैठकीत उपस्थित असणाऱ्या अनेकांना पडला आहे. 

          वेळ प्रसंगी प्रशासनाला जाब विचाराने आणि गरज पडल्यास प्रशासनाला धारेवर धरून न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकारानाचं या बैठकीत डावळल्याने हा विसर असावा कि जाणीवपूर्वक केलेली कृत्य असा प्रश्न सध्या शहरात वर्तविला जात आहे. सदर बैठक पोलीस निरीक्षक बल्लारपूर श्री. उमेश पाटील यांनी आयोजित केली होती यात सर्व राजकीय पक्षाचे नेते, दिग्गज व्यापरी, सामाजिक कार्यकर्ते, व शहरातील प्रठीस्थित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते परंतु सदर बैठकीत भारताचा चौथा स्थंभ ( Fourth pillar of India) म्हणून ओळखला जाणारा पत्रकार बंधू यांना बल्लारपूर पोलीस स्थानक  Ballarpur Police Station ) मार्फत जाणीवपूर्वक डावळण्यात आले असून हा स्थानिक पत्रकारांचा अपमान आहे.  वेळो-वेळी शहरातील शांतता कायदा सुवेवस्ता राखण्यसाठी पत्रकार सोमर येतात तसेच पोलीस प्रशासनाला अहोरात्रो सहकार्य करतात तरी हि स्थानिक पत्रकार बंधूंना शांतता बैठकीतून डावळल्याने पत्रकार व बैठकीत उपस्थितांकडून खंत वेक्त केली जात आहे. 

To Top