ताडोबा क्षेत्रातील एका परिवारातील एकापेक्षा अधिक जिप्सी काढून "१ कुटुंब १ रोजगार" रबवून सर्वांना समान रोजगाराची संधी द्या- श्री. सुरज ठाकरे

महावाणी - विरेंद्र पुणेकर
३० सप्टेंबर २३

    चंद्रपूर: सद्यस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत ज्वलंत अशा परिस्थितीमध्ये बेरोजगारांच्या उदरनिर्वाह करिता रोजगार हा सर्वांनाच हवा आहे..! परंतु ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जिल्हा चंद्रपूर येथे गेल्या दहा वर्षापासून एकाच कुटुंबांमधील एकापेक्षा अधिक ओपन जिप्सी सफारी चा रोजगार एकाच कुटुंबातील सदस्यांच्या नावांनी वनविभाग प्रशासनाची दिशाभूल करून मिळून बसल्याचा प्रकार हा काही नवीन नाहीच. परंतु कुठेतरी याच कारणाने इतर गरजू 

    बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळण्यास अडथळा निर्माण होत असल्याने इतर बेरोजगार तरुण-तरुणी या रोजगारापासून वंचित आजही आहेत. याबाबत  तक्रारी याआधी सुद्धा झाल्या आहेत. या गंभीर समस्येला घेऊन  आम आदमी पक्षाचे श्री. सुरज ठाकरे, मा. जिल्हाध्यक्ष कामगार संघटन तथा जिल्हा उपाध्यक्ष, चंद्रपूर यांनी १ वर्षा आधी एक कुटुंब एक जिप्सी करून सर्वांना रोजगाराची समान संधी देण्याबाबत वनविभाग प्रशासनाला दिनांक:- ०५/११/२०२२ रोजी निवेदन देण्यात आले होते. याचबरोबर ताडोबा क्षेत्रामध्ये “१ कुटुंब १ रोजगार” योजना राबवून वाढती बेरोजगारी कमी करण्याकरिता आणखी दिनांक:- ११/११/२०२२ रोजी संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. यानंतर दिनांक:- २०/१२/२०२२ रोजी माननीय वनमंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या विषयाची दखल घेत कार्यकारी संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनाची दखल घेण्यास पत्र पाठविले होते. परंतु वर्ष होऊन देखील आजही ताडोबा क्षेत्रामध्ये एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक ओपन जिप्सी चे रजिस्ट्रेशन होऊन जिप्सी धारकांना परवाना देऊन वन विभागाने इतर बेरोजगारांना डावलून एकाच कुटुंबातील सदस्यांना रोजगाराची संधी मिळवून दिली आहे. अशा प्रकारामुळे त्या ठिकाणी शहरातील तरुणांना स्थानिक रहिवाशी हवे असल्याचे कारण देत रोजगार तर नाहीच परंतु शेजारच्या गावातील लोकांना देखील जिप्सीचा कोटा फुल असल्याचे कारण सांगून  रोजगार मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे. कारण या क्षेत्रातील इतरही गावकरी नवीन जिप्सी घेऊन लावण्यास इच्छुक आहेत परंतु एकापेक्षा अधिक असलेल्या जिप्सी धारकांमुळे इतर इच्छुकांना या ठिकाणी रोजगार मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे. करिता इतरांनाही संधी मिळावी याकरिता श्री. सुरज ठाकरे यांनी १ कुटुंब १ रोजगार रबवून सर्वांना समान रोजगार देण्याबाबत प्रशासनाला आज दिनांक:- ३०/०९/२०२३ रोजी मा. वनमंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन दिले.

 व निवेदनामध्ये नमूद एकापेक्षा अधिक ओपन जिप्सी धारकांपैकी सुरज ठाकरे यांना प्राप्त तक्रारीनुसार:-

खालील सर्व सदस्य एकाच कुटुंबामध्ये वास्तव्यास असून हे सदसस्थितीत मोहोर्ली येथील रहिवासी नाहीच.

    एकाच कुटुंबातील जिप्सी धारक:-         

१) सौ. वनमाला प्रेमदास कातकर – MH-32-AH- 2016 (ML- 58)   कोर 

२) सौ. संगीता प्रेमदास कातकर –  MH-34-AM- 4082 (ML- 46)   कोर 

३) श्री. दिपक प्रेमदास कातकर –   MH-34-AM- 7825 (ML- 46)   बफर 

वरील सर्व लाभार्थी हे:-

राहणार BJM कारमेल अकॅडमी स्कूल, च्या मागे राजलक्ष्मी अपार्टमेंटच्या बाजूला, छत्रपती नगर तुकूम येथे गेल्या ३० ते ३५ वर्षापासून वास्तव्यास आहेत. 

१) सौ. वनमाला प्रेमदास कातकर ( जिप्सी रोजगार लाभार्थी असूनवन देखील विभागाकडून २०,०००/- रुपये प्रति /महा पेन्शन धारक)

२) सौ. संगीता प्रेमदास कातकर तिसरी मुलगी (जिप्सी रोजगार लाभार्थी तथा /नर्स असून चंद्रपूर जिल्ह्यातील दवाखान्यांमध्ये सेवा देत आली आहे)

३) श्री. दिपक प्रेमदास कातकर मुलगा (जिप्सी रोजगार लाभार्थी/मेकॅनिकल इंजिनिअर/ अनुकंपा तत्वा मधील राखीव नोकरी यासह मोहोर्ली येथील MTDC रोड वर ३ AC/Non AC सूट चे वाईल्ड होम स्टे आहे.

    वरील सर्व सदस्य चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदान करतात तथा यांची त्या यादीमध्ये नावे देखील आहेत. ज्याची माहिती मतदारसंघाच्या यादीमध्ये नमूद आहे.

    तरीदेखील या कुटुंबातील ३ जिप्सी धारक मोहोर्ली येथे यांचे वास्तव्यास राहायला घर नसून रोजगार प्राप्त करण्याकरिता बांधलेले फक्त तीन रूम आणि १ किचन चे होम स्टे आहे. तरी देखील यांनी मोहोर्ली ग्रामपंचायत ची दिशाभूल करत मोहोर्ली येथील रहिवासी दाखला प्राप्त करून मोहोर्ली येथील रहिवासी असल्याचा दावा करतात हे जिप्सी रोजगार लाभार्थी सर्रासपणे बेकायदेशीर फर्जी काम करून रोजगार प्राप्त केली आहे. अशाच प्रकारे या कुटुंबाने रोजगार प्राप्ति करिता वनविभागाची देखील दिशाभूल केलेली असून हा प्रकार बेकायदेशीर असल्याने यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तात्काळ यांच्या जिप्सी काढण्यात याव्या अशी मागणी यावेळेस श्री. सुरजभाऊ ठाकरे, आप जिल्हाध्यक्ष कामगार संघटन तथा उपजिल्हाध्यक्ष, चंद्रपूर यांनी प्रशासनाला करून इतर गरजू बेरोजगारांना या ठिकाणी १ कुटुंब १ रोजगार योजना राबवून अत्यंत गरजू बेरोजगारांना रोजगाराची समान संधी देण्यात यावी अशी मागणी समस्त तक्रार कर्त्यांन तर्फे केलेली आहे.

By removing more than one gypsy from one family in Tadoba area and implementing "1 family 1 employment" give equal employment opportunity to all - Shri. Suraj Thackeray ) ( Suraj Thakre ) ( Mahawani ) ( aam aadmi party ) ( Tadoba ) ( Chandrapur ) ( 1 family 1 employment )

To Top