सास्ती- राजुरा मार्गाची चाळण खड्यामुळे वाहन चालक त्रस्त.

Mahawani




महावाणी- विरेन्द्र पुणेकर
०३ ऑगस्ट २०२३  

        राजुरा: सास्ती  राजुरा मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहे मागील ३ वर्षा पासुन सास्ती - राजुरा मार्गाची दुरावस्था कायम आहे मोठ-मोठ्या खड्यामुळे वाहतुक करणाऱ्या वाहनांना कासव गती प्राप्त झाली आहे.  ह्या वर्षी तरी हा मार्ग सुधारेल असे नागरिकांचे मत होते परंतु प्रतेक्ष स्थिती पाहता हे स्वप्नच राहणार का असा प्रश्न उपस्तीत होतोय. 

मागील तीन ते चार वर्षा पासून सास्ती- राजुरा मार्गाची दुरावस्था कायम आहे सदर मार्गावरती वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागतोय. सदर मार्गाची पावसामुळे प्रचंड दुराअवस्ता झाली असून सास्ती- राजुरा हा मार्ग बल्लारपुर राजुरा जोडनारा दुसरा मार्ग म्हनुन ओडखला जातो व पुर परस्थितीत हा मार्ग पर्यायी मार्ग म्हणून वापरात देखील आणला जातो. सदर मार्गाने वे.को.ली च्या कोळस्याने भरलेले जळ वाहन वाहतूक करतात, तसेच सास्ती शेत्रातील लगतच्या गावांना राजुरा जोडणारा हा मुख्य मार्ग आहे.

सास्ती-राजुरा मार्गाचे काम काही दिवसा पुर्वी चालु करण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव ते काम थांबवण्यात आले होते आणि काही दिवसा पूर्वी भर पावसात पुनः मार्गाचे काम चालु करण्यात आले त्यात आगोदर असलेले डाबरीकरण उखळून सपाट समतोल करन्यात आले काही भागात खळीकरन देखील करण्यात आले परंतु डांबरीकरनाच्या कामाला मुहूर्ताची वाट बघत आहे.  त्याने पावसाळ्यात मार्गाचे खोद काम केल्याने पुनः मार्गाची अत्यंत दुरावस्था पाहायला मीळत आहे. आगेदर या मार्गावर काही निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. अनेकांचा अपघात देखील या मार्गाच्या अवस्थेमुळे झाला आहे. 

सदर मार्गाने रोज वाहतूक करणाऱ्या नागरीकांत मोठा संताप वेक्त केला जात आहे. व प्रश्न केला जात आहे की पावसात मार्गाची सुधारणा करायची नोहती व मार्गाचे काम पुनः हव्यावर सोडायचे होते तर मार्गाचे खोद काम भर पावसात का करण्यात आले जेव्हाकी आधीच हा मार्ग खड्याने माखला होता परंतु काही प्रमाणात डांबरीकरण असल्याने याता-यात होत होती किमान हा पावसाळा निघाला असता परंतु खोद कामाने मार्ग वाहतूक करण्यायोग्य उरून राहीला नाही अगोदरच मार्गाने संतापलेले नागरिक त्यात भर पावसात खोद कामणे आगीत तेल ओतल्याचे वाहतुक कर्त्याकडून बोलले जात आहे.

To Top