राजुरात गळफास घेत मीळालेल्या मृतकाची पटली ओळख

महावाणी - विरेंद्र पुणेकर
३१ ऑगस्ट २३

    राजुरा येथील चेतन होटेल Chetan Hotel Rajura शेजारी विधाते यांचा पडक्या घरात गळफास घेऊन मिळालेल्या इसमाची राजुरा पोलीसां कडुन पटली ओळख. सदर मृतकाची झळती घेतली असता मृतकाचा पॅन्टच्या खिशातून ओल्या व अस्पष्ट अवस्तेत आधार कार्ड मिळाले सदर आधार कार्ड वाचण्या योग्य नसल्याने आधार क्रमांकाची कशी -बशी ओळख करत आधार क्रमांकाने ऑनलाईन माहिती केली असता मृतकाचे नाव- विकेश गोविंदराव कोकाटे ( Vikesh Kokate ) वय ३९ वर्ष राहनार- शिवकृष्ण धाम मानकापुर, नागपूर ( Nagpur) अशी ओळख समोर आली आहे. 

    मृतक इसम नागपूर इथून राजुरा शहरात कुठे व कुनाकळे आला हा प्रश्न तसाच आहे. मृतक राजुरात किती दीवसापासुन राहत होता कुनाच्या घरी आला किव्हा कुना व्यावसायिका कळे काम करण्या करीता आला होताका व तो  विधाते Vidhate यांच्या घरी पोहचला कसा नागरीकात चर्चेचा विषय आहे.

     मृतकाचा मृतदेह मिळालेल्या ठिकाणचे छायाचित्र व नागपूर ते राजुराशी संबंध पाहता हत्या कि आत्महत्या ( Murder or suicide ) अशी शंका वेक्त केली जात आहे.

समोरील तपास राजुरा पोलीस निरीक्षक श्री. विशाल नागरगोजे Vishal Nagargoje यांचा निदर्शनात राजुरा पोलीस करीत आहे. ( Rajura Police) ( Mahawani )


To Top