राजुरातील सुप्रसिद्ध चेतन हॉटेल बाजूला विधाते यांच्या घरी गळफास घेऊन अज्ञात इसमाचा आढळला मृतदेह!

    

महावाणी  - विरेन्द्र पुणेकर
३० ऑगस्ट २३

    राजुरा: आज दुपारी ४:०० च्या सुमारास राजुरातील सुप्रसिद्ध चेतन हॉटेल बाजूला विधाते यांच्या घरी गळ फास घेऊन अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला मागील काही दिवसा पासुन विधाते यांच्या घरातून घाण वास येण्याची तक्रार शेजाऱ्याकडून सातत्याने केली जात होती. त्या घाण वासेला कंटाळून सदर घान वास कुठून येत आहे याचा शोध घेत शेजारच्या एका इसमाने विधाते यांचा घराची पाहणी केली असता विधाते यांचा घरी गळ फास घेऊन असलेला मृतदेह आढळला सदर बाब तत्काळ राजुरा पोलिसांना कळवण्यात आले राजूरा पोलिसांनी सदर घटनास्थळाची पाहणी करत मृत देह शवविच्छेदन करिता रवाना करण्यात आला. ( The body of an unknown person was found hanging in Rajura )
    
    मृताचे वर्णन अंगात पांढऱ्या रंगाचा बाहि मुडपलेला शर्ट, काळ्या रंगाचा पॅन्ट, डाव्या हातावर "आई" असे इंग्रजीत लिहलेले व किंग चे चिन्ह गोदलेले आहे. शेजाऱ्या कडून मिळालेल्या माहिती नुसार विधाते यांचा परिवार गेल्या ५ महिन्या पासून सदर घरून दुसऱ्या घरी राहण्यास गेले असून मागील ५ महिन्या पासून सदर घर हे बंध आहे व या घरात कुणाचे येणे जाने नाही असे बोलले जात आहे. समोरील तपास राजुरा पोलीस निरीक्षक श्री. विशाल नगरगोजे यांच्या निदर्शनात राजुरा पोलिस करीत आहे. ( Rajura Police) (Mahawani)

To Top