संगमनेर अभियंता श्री.वर्पे साहेब यांचे सोबत पोलीस कॉलोनी वसाहती बाबत संशिप्त चर्चा.

    


महावाणी - विरेंद्र पुणेकर

        राष्ट्रीय अध्यक्ष श्री कौसरभाई शेख ( Kousar Bhai Sheikh ) यांच्या आदेशानुसार नवभारत माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र फौंडेशन (Navbharat Information Rights Journalist Protection and Police Mitra Foundation ) चे संगमनेर येथील पदाधिकाऱ्यांनी यापुर्वी पोलीस वसाहतीत जाऊन तेथील पहाणी करून व पोलीस बंधू बहिणींची समस्या जाणून घेतल्या होत्या व तेथील परिस्थितीची जाणून घेत  संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले मा. श्री वर्पे साहेब, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, उप-अभियंता विज मंडळ श्री सुर्यवंशी साहेब व नगरपरिषद CO साहेब श्री राहुल वाघ साहेब यांना देण्यात आले आहे. श्री वर्पे साहेब बरोबर सदर संशिप्त चर्चा केली .

वरील सर्व अधिकार्यांनी त्वरित लक्ष देऊन संगमनेर पोलीस वसाहत त्वरित कामाला सुरुवात करणार असे आश्वासन दिले. तसेच याप्रकरणी संगमनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. सत्यजित तांबे साहेब यांनी सदर बाबीची दाखल घेत विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून नवीन पोलीस वसाहत निर्माण व्हावी यासाठी मागणी केली आहे.

नवभारत फौंडेशनचे श्री मुरलीधर देशमुख साहेब, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, सौ वैशाली डावखरे मॅडम, अध्यक्षा उत्तर महाराष्ट्र, सौ सरला सुर्यवंशी मॅडम, मुख्य महासचिव उत्तर महाराष्ट्र, सौ कल्पना काळे मॅडम, संपर्क प्रमुख उत्तर महाराष्ट्र, कुमारी मंजु माचरेकर, उपाध्यक्षा अहमदनगर जिल्हा, श्री बशीर शेख, संघटक अहमदनगर जिल्हा, श्री अल्लाबक्ष शेख, उपाध्यक्ष अहमदनगर जिल्हा व श्रीमती लक्ष्मीबाई कोंका मॅडम, उपाध्यक्षा संगमनेर शहर हे सर्वांनी उपस्थित राहून छान कार्य केले आहे.

To Top