महाराष्ट्र आज कोरड्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर





महावाणी- विरेंद्र पुणेकर
२६ ऑगस्ट २३

        या वर्षाच्या सुरवाती पासून या वर्षी कमी पाऊस पडला आणि (EL Nino) अल नीनो चा प्रभाव पडला असा अंदाज वर्तव्यात आला होता. पन आपल्या हवामान विभागाने हा अदांज खोडून काढत सर्व दुर चांगला पाऊस पडेल असा विश्वास दीला विविध ठीकाना हुन या संदर्भात खात्री देण्यात आली ज्याच्या वर्ती विश्वास ठेवत बळीराजा ने पेरणी केली आणि मोठ्या प्रमानात खर्च देखील केला पण आत्ता त्याचे कष्ट, वेळ आणि केलेला खर्च वाया जान्याची भीती निर्माण झालेली आहे.

सरकार दरबारी राज्याच्या सरासरी च्या ८९%  टक्के पाऊस झाल्याची नोंद जरी असली तरी सुद्धा यात कीतपत सत्य आहे हे आपल्या समोर दीसतच आहे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, या सर्वच भागतील बौतांश जिल्ह्यामध्ये, गावांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही आहे.

आकोला, वासीम, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपुर, गोंदिया , जालना, बिळ, लातूर, नांदेळ, परभणी, हिंगोली, इथली परस्थीती अधीक चिंत्ता जनक आहे. पुन्हा पेरनीची शक्यता आता मावळत चालली आहे कारण येत्या काही दीवसात पाउस नाही आला तर रब्बीचा हंगाम देखील हाताशी लागणार नाही आणि दीवसादीनी पाण्याचा प्रश्न हा अधीक गंभीर होत जाईल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक बिकट होत जाईल.

राज्यामधे आजच्या दीवशी 100% टक्केच्या आस पास पाऊस झालेला आहे. फक्त सहा जील्हे आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील धरणाचा विचार केला तर या धरणा मधे 42% टक्के पाण्याचा साठा आहे. आणि जर का आपण त्या त्या जिल्ह्या पुर्त किव्हा तालुक्या पुर्त कीव्हा अगदी गाव पातळी वर येऊन बोलायचे झाले तर परीस्थीती ही खुप भयानक आहे. कारण असा अनुभव खूप झनांना आलेला असेल की चार पाच गाव सोडून अलीकड च्या गावामधे मोठ्या प्रमाना मध्ये पाऊस झालेला आहे. पन आपल्या गावामधे पाऊस झालेला नाही. त्याचामुळे या संदर्भातील काही आकडेवारी समोर यायची आहे. ती गावा नुसार समोर येन अपेक्षित आहे. नाकी जिल्ह्यनुसार नाकी तालुक्या नुसार कीव्हा महाराष्ट्राची सरासरी काढून याच्या विषयच प्रतेक्ष चीत्र समोर येणार नाही. 

एक वेळ ओला दुष्काळ परवडल पन कोरडा दुष्काळ प्रचंड नुकसानदाई असतो.  दुष्काळ म्हणजे पीन्याचे पानी सुध्धा उपलब्ध होत नाही इतकी पान्याची टचाइ निर्माण झालेली असले आणि यात भर असते ते कमी पावसाची. पाऊस कमी जर का पडला तर उष्णता वाढत जाते कोरडे वारे वाहायला लागतात आणि याच्या मुळे पान्याची मागणी अजुन वाढते आणि सदर प्रश्न अधीक उग्ररूप धारन करतो.

सध्याच्या परीस्तीतीला सामोर जाण्यासाठीची योजना समोर काही दीसत नाही आहे. काही दीवसा पूर्वी मंत्री मंडळाची बैठक  झाली होती त्या मधे पाण्याच्या आणि जनावराच्या चाऱ्याचा आडावा घेण्यां संदर्भात सुचना देण्यात आलेल्या आहे. पन अजुनही दुष्काळांच्या संकटाची सखोल जानीव होताना दीसत नाही आहे. सरकारला पन होत नाही आणि नागरीकांना सुद्धा हे होतानांचे दीसत नाही आहे. त्यातल्या त्यात याची जानिव किव्हा याची झळ जर का कुणाला बसल असेल तर ते शेतकऱ्यालाच बसत आहे. हिच परीस्थीती जरका पुढच्या महीन्या पर्यंत सतत राहीली तर कोरडा दुष्काळ जाहीर करावा लागेल याच्या मुळे शेती उत्पादना मधे घट होइल शेतकऱ्या समोरच्या अडचणी वाढतील माहागाइ मोठ्या प्रमानात वाढल उत्पादन कमी होइल आणि खर्च करन्याची जी शमता आहे ती कमी होईल आणि याचा अर्थवेवस्थे वरती मोठा परीनाम होइल कारन भारत हा कृषी प्रधान देश आहे अजून हि ५५ ते 60 टक्के जनता ही शेती वर्तीच वलंबुन आहे. 

To Top