पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार राजुरा शहरात


सेवा केंद्र तथा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

महावाणी - विरेंद्र पुणेकर
12 ऑगस्ट २३

    राजुरा : राजुरा शहरात भारतीय जनता पार्टीचे विधानसभा जनसंपर्क कार्यालय तथा सुधिरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तयार करण्यात आले असून आज शनिवारला दुपारी ३ वाजता पटवारी भवन, भारत लॉज जवळ तयार करण्यात आले असून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याचे अध्यक्ष हंसराज अहीर अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग भारत सरकार हे राहणार असून प्रमुख अतिथी हरीश शर्मा जिल्हाध्यक्ष भाजपा चंद्रपूर, एड .संजय धोटे माजी आमदार राजुरा, सुदर्शन निमकर माजी आमदार राजुरा, खुशाल बोंडे भाजपा जेष्ठ नेते यांची उपस्थिती राहणार आहे.


सुधिरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र व जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरीक व विद्यार्थ्यांना दाखले काढून देण्याचे काम होणार आहे सोबतच नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी या जनसंपर्क कार्यालयाची मदत होणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान देवरावदादा भोंगळे निवडणूक प्रमुख ७०-राजुरा विधानसभा तथा माजी जिल्हाध्यक्ष भाजपा यांनी केले आहे.


To Top