साखरी- पोवणी मार्ग २२ तारखे परियंत सुरडीत नकेल्यास आंदोलन करत खादानीचे काम बंध करू.




महावाणी - विरेंद्र पुणेकर
(१३ जुलै २०२३)

                साखरी खदान पोवणी-२ आणि ३ सुरु होऊन सहा वर्ष पूर्ण झाले. परंतु आज सहा वर्ष पूर्ण होऊनहि कोळसा वाहणारे वाहन (ट्रक) रोजच्या वाहतुकीच्या मार्गावरच साखरी - पोवणी हा मार्ग लगतच्या सर्व गावांना राजुरा तालुक्याशी जोडणार एकमेव मार्ग असून ह्या मार्गाने रोज शेतकरी, विध्यार्थी, कीर-कोळ, वेवसाईंक, गावकरी याच मार्गाने तालुक्याला आठवडी बाजारात तसेच विध्यार्थ विध्यालयात यातायात करत असून सदर मार्ग मोठ मोठ्या कोळसा वाहून नेणाऱ्या वाहनाने (ट्रक) भरला आहे.  आजही ह्या वाहना करिता वाहनतळ (parking spot) नसल्याने वाहने मार्गाच्या दोन्ही बाजूने उभी असतात या करिता मार्गाने वाहतून करणे अशक्य झाले आहे.  विध्यार्थ्यांना विध्यालयात जाण्या करिता तसेच इतर वाहतूक करणाऱ्यानां नाहक त्रास भोगावे लागत आहे. नुकतेच काल  सकाळी ११:०० च्या सुमारात महामंडळ व विध्यार्थ्यांना घेऊन जात असलेली बस या मार्गावरती ३ तास अडकून होती ज्याने विद्यार्थ्यांना विध्यालयात तसेच इतर प्रवास्यांना पोहचायला ३ तास विलंब झाला होता. सतत ३ तास प्रवाशी तसेच विध्यार्थी मार्गावरती थांबावे लागण्याने प्रव्यास्यातून मोठा संताप दिसून आला होता. सदर समस्या बाबत सतत गेल्या ५ वर्षापासून प्रती वर्षी वारम-वार WCL विभागाला निवेदन, पत्रवेवहार करून देखील याकळे दुर्लक्ष होत आहे. हे पाहता आज शिवसेना राजुरा तालुका प्रमुख - सचिन गोरे (sachin gore) यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. सदर मार्गाचे काम समोरील २२ तारखे परियंत सुरडित नकेल्यास  आंदोलन करत खदानीचे काम बंध करण्यात येईल याची दक्षता घ्यावी असे निवेदना मार्फत WCL विभागाला आज देण्यात आले. या वेळी खुशाल सूर्यवंशी, प्रकाश रबाजी, गजानन साळवे, राजू गड्डम, प्रफुल कर्णेवार, बालाजी बोबळे, सुरेश ठीप्पे, अनिल गोरे, बंडू डोंगे,  शिवसेना कार्यकर्ते, ट्रक उनिअन कार्यकर्ते, ट्रक वाहन चालक, व इतर उपस्थित होते.

To Top