सास्ती क्षेत्रातील मानोली - बाबापूर व कढोली - चंद्रपूर मार्ग बंद

महावाणी - विरेन्द्र पुणेकर 
२३ जुलै २०२३ 

        राजुरा: मागील सतत मुसळधार पाण्याने चंद्रपुर जिल्ह्यातील अधिकतम विभागाचे संपर्क तुटले होते तसेच काल व आज सकाळी धरनाचे दार उघडल्याने पाण्याचा स्तर सर्वत्र पसरला असुन मुख्यात मानोली- बाबापुर पोवनी, गोवरी, व कढोली यां गावाचे तालुका व जिल्ह्याशी सर्पक तुटले आहे.  पाण्याच्या स्तर  सातत्याने वाढत असल्याने सदर गावातील नागरीक भीतीमय झाल्याचे दीसुन येत आहे. सकाळी 11:०० च्या सुमारास राजुरा माणोली हा मार्ग मोकळा होता परंतु 12:०० च्या सुमारास हा मार्ग सर्व पाण्याने व्यापून बंद झाला मानोली सह बाबापुर, कढोली, चार्ली, निर्ली, गोवरी, पोवनी या गावाचे तालुका व जिल्ह्याशी संपर्क तुटले मानोली गावातील नागरिक बोलत होते की सदर वर्षी इतक्या मोठ्या  प्रमानात पाण्याची धाव कोलगाव वे. को. ली चे मोठ-मोठे मातीचे ढिगार यांच्या मुळे आहे.  कारण मानोली बाबापूर हे गाव वे.को.ली. क्षेत्राने चोही बाजूने व्यापलेले असल्याने चारही बाजूने वे. को. ली. च्या मातीचे मोठ मोठे धीगार आहे. या मुळे पाणी समोर न जाता सदर गावाकडे वळले आहे.  या कारणाने सर्वत्र गावात भीतीचे वातावरण पसरले आहे मानोली-बाबापूर गावातून मुख्य मार्ग विना पर्यायी मार्ग नाही एखाद्या नागरीकाला आरोग्य सेवेची गरज भासली तर तो मानोली गावातून कुठेही जाऊ शकत नाही पर्यायी या कारना मुळे एखादया रुग्णाला आपले जीव गमवावे लागेल यात दुमत नाही. तसेच मानोली-बाबापुर हे गाव वे.को.ली. बल्लारपूर क्षेत्रा मार्फत दत्तक घेतलेले क्षेत्र आहे. तरी वे. को. ली. मार्फत या गावां करीता कुठली ही उपाय योजना केली जात नाही तसेच वारंवार  पत्रवेव्हार करून देखील एकाद्या होणाऱ्या घटनेची पूर्व कल्पना,  किव्हा अतीवृष्टीची माहिती पत्रामार्फत वे को. ली. ला दीली असता वे.को.ली या वरती कुठली ही प्रतीक्रिया वे. को. ली.  wcl  मार्फत घेतली जात नाही असे मानोली व बाबापूर वासियांचे बोलने आहे.  मानोली गावाला चौही बाजूने वे. को. ली. चा विळखा असल्याने सदर गावाला पुर-परिस्थिती पाण्यातून बाहर येने किव्हा एखाद्या रुग्णाला आरोग्य सुविधा पोहचवने अशक्य आहे. हे पाहता मानोली गावा करीता पर्यायी मार्ग देण्याची मांग होत आहे. शासनाने या विषयाकळे तात्काळ लक्ष देत समोरील पुरा आधी पर्यायी मार्ग काढावा अशी प्रामुख्याने मांग होत आहे.
To Top