HP GAS धारकांनो लक्षद्या १ जुलै पासुन ४ जुलै पर्यंत गॅस सेवा खंडितलोकवाणी
(१७ जून २०२३)
    
        HP GAS धारकांनो लक्षद्या १ जुलै २०२३ पासुन दिनांक 4 जुलै 2023 पर्यंत HP GAS- (Hindustan Petroleum Corporation Limited) कंपनीकडून संगणकीय प्रणालीमधे नविन घडामोडीचे कार्य करण्यात येणार आहे. या कालावधीत गॅस सिलेंडर भराई संयंत्र चे काम-काज पूर्णपणे बंद राहणार असल्यामुळे कंपनीकडून एजन्सीला गॅस सिलेंडर चा पुरवठा बाधित होऊन इतर सर्व व्यवहार विस्कळीत राहण्याची पूर्ण शक्यता आहे. कंपनीकडून संगणकीय प्रणालीमधे नविन घडामोडीचे काम सुरळीत होईपर्यंत ग्राहकांना वेळेवर गॅस सिलेंडर्स उपलब्ध करून देण्यास व इतर कामासाठी एजन्सी असमर्थ होण्याची संभावना आहे करिता सर्व गॅस ग्राहकांना नम्र निवेदन आहे कि आपण आपल्याकडील गॅस सिलेंडर व अतिरिक्त सिलेंडर असल्यास ते या जून महिन्यात 30 जून 2023 चे आधी भरून ठेवावे. संभावित गैरसोय टाळण्याकरिता आमचेकडे अतिरिक्त गॅस सिलेंडर त्वरित उपलब्ध आहे. या कठीण काळात आपण सहकार्य करावे ही नम्र विनंती. ग्राहकांना होणाऱ्या संभावित गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

Hindustan Petroleum Corporation Limited

To Top