भारत राष्ट्र समिती चा प्रचार पोचतोय गावो गावी!


लोकवानी- विरेंद्र पुणेकर
(१४ जून २०१२३)

१५ जुन ला के.सी.आर.नागपूरात.

विदर्भातील सर्व  विधान सभाक्षेत्रातून कार्यकर्ते  एकवटणार

चंद्रपुर जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपसथित राहणार.....!अंगलवार 

           भारत राष्ट्र समिती   महाराष्ट्र चे विदर्भ  स्तरीय   पक्ष प्रचार व प्रसार कार्याचे आढावा व आगामी काळात होऊ ञघातलेले  सर्व निवडणुकीत  सहभागी होण्यासाठी  रणनिती आखणे संदर्भात  भारत राष्ट्र समिती चे   विदर्भ स्तरीय अधिवेशन नागपूर येथे कविवर्य सुरेश भट सभागृहात  15 जुन2023 ला मान  श्री  के .चंद्रशेखर राव राष्ट्रीय अध्यक्ष भारत राष्ट्र समिती यांचे  अध्यक्षीय मार्गदर्शनात  व विदर्भ प्रभारी मा.बालका सुमन  आमदार , मा.ज्ञानेशजी वाकुडकर  नागपूर  विभाग  समन्वयक  व विविध मान्य वर यांचे प्रमुख उपस्थितीत  संपन्न होणारं आहे. 

भारत राष्ट्र समिती चे प्रचार यात्रा संपुर्ण महाराष्ट्रात राषट्रीय अध्यक्ष के . चंद्रशेखर राव  , माणिकराव कदम राज्य किसान समीती , शंकर अण्णा  धोंडगे जेष्ठ नेते , आणि सर्व  विभागीय समन्वयक  यांचे  नियोजनात  राज्यात  सर्व  विधान सभाक्षेत्रात  भारत राष्ट्र समिती चे प्रचार यात्रा  फिरत  असून चंद्रपुर जिल्हा  व लोकसभाक्षेत्रातील  सर्वच  विधान सभाक्षेत्रात पक्ष प्रवेशासाठी व सदस्य नोंदनीसाठी भारत राष्ट्र समिती ची  मोहीम पक्ष प्रचार व प्रसार साहीत्य  गीत, ध्वनी प्रक्षेपण साहीत्य, बॅनर , पोष्टर, बिल्ले  टोप्या. तोरणे,दुपट्टे  व के.सी.आर. साहेबाचे दुरदृष्टीतून नियोजनातुन तयार केलेले सर्व  देशव्यापी  योजनांचे लिखित  पुस्तके, पत्रके  व ईतर साहीत्य  घेऊन प्रचार यात्रा गावोगावी जात आहेत. चंद्रपुर  लोकसभा क्षेत्रातील  राजुरा विधान सभाक्षेत्रातही भारत राष्ट्र समिती राजुरा विधान सभाक्षेत्र जि चंद्रपुर  चे समन्वयक आनंदराव वाय. अंगलवार  यांचे  नेतृत्वात राजुरा, गोंडपिपरी, कोरपणा, जीवती तालुक्यात  प्रचार यात्रा सुसज्ज  गाडीने गावा गावात चौका-चौकातुन फीरून  पक्षाचे ध्येय धोरण घरोघरी जाऊन पटवून सांगून   तालूका  समीती  सह ,शेतकरी समीती, युवक- युवती समीती ,महिला समी ओ.बी.सी समीती,एस. सी. व एस.टी.मागासवर्गीय समीती , अल्पसंख्याक समीती  , विद्यार्थी समीती असे विविध समित्या  गाव , पंचायत समीती ,जि.प.  व तालुका पातळीवर तयार करत ईच्छूकांचे सदस्यत्व नोंदनी व पक्ष प्रवेश  करत  भारत राष्ट्र समिती चे प्रचार यात्रा  गुलाबी झेंडा जनतेचे दारी  व चौका- चौकात  फडकवत  सर्व  गाव परिसर गुलाबी रंगाने   रंगीत  करून  झंझावात दौरा राजूरा विधानसभा क्षेत्रात  संपूर्ण  गावा-गावातुन फिरत आहे. जनसमूदायाचे उत्तम प्रतिसाद  मिळतो आहे..  या कार्यात  आनंदराव वाय.अंगलवार राजुरा विधान सभाक्षेत्र  समन्वयक  सह  संतोष कुळमेथे , रेशमाताई चव्हाण   अजय सकिनाला, सन्नी रेड्डी, ईसलाम शेख, जीवनदास चौधरी  नागेश ईटेकर, सुनिल साखलवार,मिनाक्षी मुन व अनसुर्या नुथी,  ज्योती नळे , भिमराव जुमनाके, गणेश शेंबळे, अरविंद चव्हाण,  किशोर मडावी. आशिष नामवाड , शंकर ईगडपलीवार, इत्यादी  हिरहिरीणे पक्ष  प्रचार व प्रसार कार्यात सहभाग उल्लेखनीय कार्य करून राजुरा विधान सभाक्षेत्रात भारत राष्ट्र समिती  चे  मुसंडी मारणार असे बेत आखत आहे.  आणि 15 जुन2023 ला मान. के  चंद्रशेखर राव  राष्ट्रीय अध्यक्ष  भारत राष्ट्र समिती  तथ मुख्यमंत्री  तेलंगाणा  राज्य  याचे अध्यक्षतेत   महाराष्ट्र प्रदेश  कोअर कमेटी , विदर्भ प्रभारी  मान.बालका सुमन आमदार चेन्नूर तेलंगाणा  व नागपूर  विभागीय समन्वयक श्री  ज्ञानेश वाकुडकर     व सर्व  जिल्हा  समन्वयक यांचे  प्रमुख  उपस्थितीत  कविवर्य  सुरेश भट सभागृहात  रेशिम बाग जवळ  नागपूर  येथे संपन्न  होणार्या भारत राष्ट्र समिती चे  विदर्भ  स्तरीय अधिवेशनात   चंद्रपुर  लोकसभा क्षेत्रातील व राजुरा विधान सभाक्षेत्रातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपसथित राहावे असे  आनंदराव वाय .अंगलवार समन्वयक राजुरा विधान सभाक्षेत्र  यांनी  एका पत्रकाद्वारे आवाहन करित आहे.

To Top