बाळू फाउंडेशन तर्फे जागतिक क्षय रोग व पितृ दिन निमित्त रुग्णांना पोषण आहार वाटप. सौ.अमृता अमित महाजनवार यांचा प्रेरणादायी उपक्रम !

Mahawani

 

लोकवाणी- विरेंद्र पुणेकर
(१८ जून २०२३)


        चंद्रपूर जिल्ह्यातील कुपोषणा बाबत कार्य करणारी अग्रगण्य संस्था बाळू फाउंडेशन  ( Balu Foundation ) यांचे वतीने आज पंचायत समिती सींदेवाही येथे आयोजित कार्यक्रमात जागतिक क्षय रोग व पितृ दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी बाळू फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अमित महाजनवार  ( Amit Mahajanwar ) यांच्या पत्नी सौ.अमृता महाजनवार यांचे वतीने 15 क्षयरोग ग्रस्त रुग्णांना पोषण आहार वाटप व शारीरिक तपासणी करण्यात आली. प्रसंगी बाळू फाउंडेशन चे अमित महाजनवार, आलेसुर च्या सरपंच सौ. पंचभाई, खातगाव ग्रामपंचायत सदस्य व बाळू कार्यकर्ते तेजेंद्र नागदेवते, क्षयरोग नियंत्रण पथक सिंदेवाही चे पराग बनकर व विलास साखरे ,बाळू चे मनोज अलोने,प्रशांत गेडाम, प्रवीण गेडाम उपस्थित होते.


To Top