बल्लारपूर विसापूर पावर हाऊस जवळ भीषण अपघात !

बल्लारपूर विसापूर पावर हाऊस जवळ भीषण अपघात

लोकवाणी- विरेंद्र पुणेकर

        बल्लारपूर तालुक्यातील विसापूर पॉवर हाऊस जवळ  हायवे रोडजवळ आज दिनांक 27/06/2020 ला सकाळी 7.30 ते 8.00 वाजता बल्लारपूर वरुन चंद्रपूर कडे जाणा-या उभ्या असलेल्या ट्रकला बाईक स्वारांनी जबर धडक दिली. मोटरसायकल क्र.MH34-BP 2927 या दुचाकीवरून बल्लारपूर  कन्नमवार वार्ड येथील युवक सुमित विनोद पुरी व गुड्डू मेश्राम हे दोघेही चंद्रपूर कडे जात असता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली.त्यात सुमित विनोद पुरी वर 16 वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला.व दुसरा गुड्डू मेश्राम यांची हालत गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करीत आहेत.
To Top