महसूल चोरी, पर्यावरणाचा ऱ्हास आणि सत्ताधाऱ्यांच्या नाकाखाली चाललेला गुन्हेगारी धंदा
Rajura Sand Mining | राजुरा | तालुका हा गौण खनिजांनी समृद्ध असल्याने विकासासाठी आवश्यक कच्चा माल उपलब्ध करून देण्याची क्षमता या परिसरात आहे. मात्र याच संपन्नतेचे रुपांतर गेल्या अनेक वर्षांपासून खुलेआम लुटीत होत आहे. वर्धा नदी, तिची उपनदी आणि इतर जलस्रोत हे केवळ पाण्याचे नाही तर प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे रेती माफियांसाठी ‘सुवर्णखाण’ ठरले आहेत. नियम, कायदे, पर्यावरणीय अटी आणि शासनाचे महसूल धोरण या सर्वांनाच पायदळी तुडवत रात्रीच्या अंधारात सुरू असलेला अवैध रेती उत्खननाचा धंदा आजही निर्ढावपणे सुरू आहे, ही वस्तुस्थिती कुणापासून लपलेली नाही.
गौण खनिज उत्खनन हा विषय केवळ महसूलाचा नाही, तर पर्यावरणीय समतोल, नदीपात्रांची सुरक्षितता, शेती, पिण्याचे पाणी आणि ग्रामीण जनजीवनाशी थेट संबंधित आहे. तरीही राजुरा तालुक्यात या सर्व बाबींवर सर्रास गदा आणली गेली. महसूल मंत्र्यांनी रेती तस्करावर सरळ मकोका लावण्याचे विधानसभेत भाष्य केले तरी देखील महसूल व पोलीस विभागातील काही भ्रष्ट घटक आणि रेती माफिया यांच्यातील संगनमत ही उघड गोष्ट असूनही, तक्रारी, निवेदने, आंदोलने आणि वृत्तांकन यांना आजवर फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही. परिणामी राज्य शासनाला कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचा फटका बसत राहिला आणि माफियांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत गेले.
Rajura Sand Mining
मात्र (दि. १५) मध्यरात्री राजुरातील हा ‘अंधारातला धंदा’ अचानक प्रकाशझोतात आला. जय भवानी कामगार संघटनेचे (JBKS) संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेसचे नवनियुक्त उपजिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मूर्ती परिसरात मोठ्या प्रमाणावर वर्धा नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन करून ती डंपिंग केल्याची माहिती मिळाली. ही माहिती केवळ अफवा नव्हती, तर प्रत्यक्ष सुरू असलेल्या गुन्हेगारी कृत्याची होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी कोणताही वेळ न दवडता तहसीलदार श्री. ओमप्रकाश गोंड आणि संबंधित मंडळ सुभाष साळवे अधिकारी यांना दूरध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली.
Rajura Sand Mining
प्रशासनाला केवळ कागदोपत्री सूचना देऊन थांबण्याऐवजी, सुरज ठाकरे यांनी प्रत्यक्ष कृतीचा मार्ग स्वीकारला. त्यांनी जय भवानी कामगार संघटनेचे शहराध्यक्ष यांना मंडळ अधिकारी साळवे यांच्यासह घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले. ही कारवाई म्हणजे केवळ पाहणी नव्हे, तर माफियांच्या डोळ्यात डोळे घालून केलेली थेट धडक होती. घटनास्थळी पोहोचताच अवैध रेती उत्खनन, वाहतूक आणि साठवणूक सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. नदीपात्र अक्षरशः ओरबाडले जात होते आणि रेतीचे मोठ-मोठे ढीग करून त्याची वाहतूक करण्याची तयारी सुरू होती.
Rajura Sand Mining
या कारवाईदरम्यान एक जेसीबी (MH-CD-6990), बिना नंबर प्लेटची ट्रॅक्टर आणि किमान आठ ब्रास रेतीचा साठा जप्त करण्यात आला. हे चित्र पाहिल्यानंतर प्रश्न उभा राहतो की, इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत असताना प्रशासनाचे, संबंधित तलाठ्याचे, मंडळ अधिकाऱ्यांचे लक्ष नेमके कुठे होते? दोन हायवा मात्र अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाल्या. मात्र त्यांचे वाहन क्रमांक MH-34-BZ-2784 आणि MH-34-BZ-2782 नोंदवण्यात आले. संबंधित वाहनमालकांना नोटीस बजावून तहसील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश द्यावेत, अशी स्पष्ट मागणी सुरज ठाकरे यांनी तहसीलदार राजुरा यांच्याकडे केली आहे. मागे असेच कोरपना तसीलदार यांनी राजुरा येथिक एका हायवा मालकाला अवैध रेती वाहतूक प्रकरणी नोटीस बजावले होते मात्र यावर कुठली कारवाई झाली हे गुपित अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
Rajura Sand Mining
या कारवाईनंतर तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांनी वेळेवर घटनास्थळी पोहोचून आवश्यक कारवाई केल्याबद्दल काही नागरिकांनी समाधान व्यक्त केले. परंतु हे समाधान तात्पुरते आहे. खरा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. हा अवैध धंदा इतकी वर्षे कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता? रात्रीच्या वेळी जेसीबी, ट्रॅक्टर, हायवा यांसारखी जड वाहने नदीपात्रात उतरतात, रेती काढली जाते, साठवणूक होते आणि वाहतूक केली जाते, हे सर्व काही प्रशासनाच्या नजरेआड कसे राहते? की नजरेआड ठेवण्याचीच व्यवस्था केली जाते?
Rajura Sand Mining
राजुरा तालुक्यातील नागरिकांच्या मते, ही केवळ एका रात्रीची कारवाई नसून, वर्षानुवर्षे सुरू असलेल्या व्यवस्थात्मक अपयशाचे हे निदर्शक आहे. महसूल विभागाकडून वेळोवेळी कारवाईचे आकडे सादर केले जातात, परंतु प्रत्यक्षात माफियांच्या नेटवर्कला धक्का बसल्याचे क्वचितच दिसते. एखाद-दुसरी गाडी जप्त करून किंवा दंड आकारून प्रश्न सुटत नाही. जोपर्यंत उत्खननास परवानगी देणारे, डोळेझाक करणारे आणि संरक्षण देणारे हात उघडे पडत नाहीत, तोपर्यंत ही लूट थांबणार नाही.
Rajura Sand Mining
रेती उत्खननाचा थेट परिणाम नदीपात्रांच्या खोलीवर, काठांच्या स्थिरतेवर आणि भूजल पातळीवर होतो. अनेक ठिकाणी शेतजमिनी धोक्यात आल्या आहेत, विहिरी आटल्या आहेत आणि पूरस्थितीचा धोका वाढला आहे. तरीही विकासाच्या नावाखाली किंवा ‘सगळीकडेच चालतं’ या मानसिकतेतून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले गेले. प्रशासनाची भूमिका अनेकदा संशयास्पद राहिली असून, कारवाई ही अपवादात्मक आणि दबावाखाली झालेलीच दिसून आली आहे.
Rajura Sand Mining
सुरज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेले धाडस हे केवळ एका संघटनेचे किंवा पक्षाचे नव्हे, तर नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे उदाहरण आहे. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटना पुढाकार घेतल्याशिवाय प्रशासन हालचाल करत नाही, ही बाब या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. यामुळे रेती माफियांना तात्पुरता धक्का बसला असला, तरी हा धक्का कायमस्वरूपी ठरेल का, हा खरा कसोटीचा प्रश्न आहे.
Rajura Sand Mining
या प्रकरणात शासनाने केवळ जप्तीपुरती मर्यादा न ठेवता सखोल चौकशी करणे अत्यावश्यक आहे. जप्त केलेल्या वाहनांचे मालक, उत्खननामागील सूत्रधार, त्यांना संरक्षण देणारे अधिकारी आणि या साखळीत सामील असलेले सर्व घटक उघडकीस आणले गेले पाहिजेत. दोषींवर कठोर कारवाई झाली, तरच या कारवाईला अर्थ प्राप्त होईल. अन्यथा, काही दिवस शांतता राहील आणि पुन्हा रात्रीच्या अंधारात नदीपात्रांवर राक्षसी बुलडोझर उतरतील, ही भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
Rajura Sand Mining
राजुरा तालुक्यातील हा प्रकार केवळ स्थानिक प्रश्न नाही, तर संपूर्ण राज्यातील अवैध गौण खनिज उत्खननाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे. शासनाने महसूल संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाबाबतची आपली जबाबदारी गंभीरपणे पार पाडली नाही, तर उद्या या लुटीची किंमत संपूर्ण समाजाला मोजावी लागेल. कालची कारवाई ही एक इशारा आहे. तो गांभीर्याने घेतला गेला, तरच रेती माफियांचे साम्राज्य खिळखिळे होईल; अन्यथा, हा ‘अंधारातला धंदा’ नव्या डावांसह पुन्हा सुरू होईल, यात शंका नाही.
What happened during the Rajura sand mining raid?
Why is illegal sand mining a serious issue in Rajura?
Were any vehicles involved in the illegal operation seized or identified?
What action is being demanded after this incident?
#IllegalSandMining #Rajura #SandMafia #MiningScam #EnvironmentalCrime #RiverSand #RevenueLoss #MaharashtraNews #LocalNews #BreakingNews #IllegalMining #SandTheft #RiverProtection #LawAndOrder #AdministrationFailure #NightRaid #JCBSeized #TractorSeized #MiningCorruption #PublicInterest #Accountability #EnvironmentalDamage #NewsUpdate #RuralIndia #Chandrapur #MiningNews #CrimeReport #Governance #NaturalResources #Justice #CivicIssues #GroundReport #InvestigativeNews #IndianRivers #IllegalTrade #SandExtraction #MiningAlert #EcoCrime #PublicConcern #NewsPortal #MediaWatch #GrassrootsNews #RuleOfLaw #CitizenAction #LocalAdministration #SustainableDevelopment #MahawaniNews #VeerPunekarReport #MarathiNews #HindiNews #RajuraNews #ChandrapurNews #SubhashSalve #OmprakashGond #VidarbhNews #RajuraTahsil
.png)

.png)