Rajura Water Pipeline | भवानी नाल्या जवळील आधार खचल्याने पाईपलाईन धोक्यात

Mahawani
0

Main pipe line near Rajura Bhavani temple

राजुरा शहरासह परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता

Rajura Water Pipeline | राजुरा | शहरातील भवानी नाल्याजवळून कोलगावकडून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर गंभीर धोका निर्माण झाला आहे. जलवाहिनीचा आधार देणारा पिल्लर पूर्णपणे खचल्याने संपूर्ण पाईपलाईन झुकली असून ती कोणत्याही क्षणी कोसळू शकते. या धोक्यामुळे राजुरा शहरासह परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे.

Rajura Water Pipeline

प्रशासनाने या स्थितीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास हजारो नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार हे स्पष्ट आहे. नगर परिषदेकडून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली ही जलवाहिनी आज दुर्लक्षामुळे धोक्यात आली आहे. भवानी नाल्यासारख्या नैसर्गिक प्रवाहावर बांधलेले पिल्लर वेळोवेळी तपासले गेले नाहीत, योग्य देखभाल केली गेली नाही, याचा परिणाम आज सर्वांसमोर आहे. नागरी सुविधा देण्यासाठी उभारलेल्या मूलभूत यंत्रणेच्या बाबतीत असा निष्काळजीपणा हा थेट नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणणारा असल्याचे राजुरातील व्यावसाईक श्री. महेश रेगुंडावार यांनी सांगितले आहे. 

Rajura Water Pipeline

पाणीपुरवठा विस्कळीत झाला, तर रुग्णालये, शाळा, सार्वजनिक ठिकाणे आणि घरगुती जीवन पूर्णपणे ठप्प होणार आहे. सध्या तरी पाइपलाईन कोसळलेली नसली तरी तिची झुकलेली अवस्था धोक्याची घंटा ठरते. याची दुरुस्ती तातडीने न झाल्यास एका क्षणात संपूर्ण वाहिनी नाल्यात कोसळून लाखो रुपयांचे नुकसान होण्यासोबतच नागरिकांना भयंकर पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.

Rajura Water Pipeline

नगर परिषद प्रशासनाने या संकटाकडे दुर्लक्ष केले, तर त्याचे दुष्परिणाम अतिशय गंभीर असतील. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि अभियंता वर्गाने घटनास्थळी जाऊन तत्काळ उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. आधार पिल्लर मजबूत करून वाहिनीचे संरक्षण करण्यात आले पाहिजे. समस्या उशिरा हाताळल्यास नाल्यात कोसळलेल्या पाइपलाईनमुळे केवळ पाणीपुरवठा थांबणार नाही तर मोठ्या प्रमाणावर संसाधनांची नासाडी होईल.

Rajura Water Pipeline

शहरातील नागरिकांचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. प्रत्येक घरात पाणी पोहोचवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. ती टाळाटाळ करून निभावली जाणार नाही. भवानी नाल्यातील खचलेला पिल्लर तातडीने उभा न केल्यास नागरिकांचा रोष प्रचंड भडकण्याची शक्यता आहे. आता तरी जबाबदार अधिकारी जागे होतील का? की पाईपलाईन कोसळून शहर तहानलेले राहिल्यावरच प्रशासन धावेल?


Why is Rajura’s water pipeline in danger?
The support pillar of the main water pipeline near Bhavani Nala has collapsed, leaving the pipeline tilted and at risk of falling.
What could happen if the pipeline collapses?
If the pipeline falls into the nala, Rajura’s water supply will be disrupted, causing severe shortages for thousands of residents.
Who is responsible for repairing the damaged pipeline pillar?
The Rajura Municipal Council and engineering department are directly responsible for restoring the collapsed pillar and ensuring water supply safety.
What urgent action is being demanded by citizens?
Citizens demand immediate reconstruction of the collapsed pillar and reinforcement of the pipeline before a complete collapse occurs.


#RajuraWaterPipeline #Rajura #WaterPipeline #PipelineCollapse #BhavaniNala #RajuraNews #WaterCrisis #InfrastructureFailure #PipelineDanger #SaveRajura #Chandrapur #Maharashtra #PipelineAlert #WaterSupply #PipelineThreat #UrbanCrisis #PipelineRepair #RajuraUpdate #WaterIssue #CityPipeline #PipelineDisaster #RajuraToday #PipelineEmergency #WaterShortage #PipelineNews #RajuraCrisis #PipelineDamage #SaveWater #PipelineAlertRajura #WaterPipelineCrisis #RajuraLive #InfrastructureCrisis #PipelineRisk #PipelineProblem #RajuraPipeline #RajuraAlert #PipelineSafety #RajuraMunicipality #WaterCrisisRajura #RajuraUpdates #PipelineHazard #RajuraPipelineCrisis #PipelineRepairNeeded #RajuraVoice #RajuraBreaking #RajuraLatest #PipelineCollapseRajura #WaterPipelineNews #RajuraBuzz #RajuraResidents #SavePipeline #MahawaniNews #RajuraNews #VeerPunekarReport #MarathiNews #MarathiBatmya #Batmya #MaheshRegundawar

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top