सात मंडळांवरील गुन्हे मागे घ्या, नाहीतर राजीनामा देईन
Rajura Ganesh Visarjan DJ Case | राजुरा | गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे थांबविण्याच्या आदेशानंतर निर्माण झालेल्या वादाला आता थेट राजकीय वळण मिळाले आहे. राजुरातील भाजप पदाधिकारी मिलिंद देशकर यांनी दि. ११ सप्टेंबर रोजी कार्यकर्त्यांना उद्देशून व्हाट्सअॅप पत्रक जारी करून थेट इशारा दिला आहे की, विसर्जनाच्या दिवशी सात गणेश मंडळांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे पोलिसांनी मागे घेतले नाहीत तर ते भाजपमधील पद व सदस्यत्वाचा राजीनामा देतील.
७ सप्टेंबर २०२५ रोजी राजुरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान रात्री १० वाजता पोलिसांनी डीजे थांबविला. त्या वेळी मिलिंद देशकर भाजपच्या महाप्रसाद वाटप मंडपात उपस्थित होते. त्याच वेळी त्यांना काही कार्यकर्त्यांचे फोन आले की पोलिसांनी डीजे थांबविला आहे. त्यानंतर त्यांनी तात्काळ आमदार देवराव भोंगळे यांच्याशी संपर्क साधला.
देशकर यांच्या मते, भोंगळे यांनी त्यावेळी स्पष्ट सूचना दिल्या की, “मिरवणूक पुढे जाऊ देऊ नका, डीजे पुन्हा सुरू करा, मी ठाणेदाराशी बोलतो आणि लगेच राजुराला येतो.” यानंतर डीजे पुन्हा सुरू करण्यात आला. Rajura Ganesh Visarjan DJ Case काही वेळातच भोंगळे प्रत्यक्ष मिरवणुकीत पोहोचले आणि डीजेच्या गडगडाटात मिरवणूक सुरू राहिली.
गुन्हा मात्र नोंदला गेला
या हस्तक्षेपानंतरही पोलिस प्रशासनाने दुसऱ्या दिवशी सात गणेश मंडळांवर गुन्हे नोंदवले. यात श्री गणेश मंडळ, नेहरू चौक या मंडळाचाही समावेश असून, देशकर स्वतः या मंडळाचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे पोलिस कारवाईमुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
देशकर यांनी म्हटले आहे की, “आमदारांच्या सूचनेनंतरच डीजे पुन्हा सुरू करण्यात आला. या प्रकरणात अनेक कार्यकर्त्यांनी आमदारांना विनंती केली होती. त्यामुळे मंडळांवर गुन्हे नोंदविणे चुकीचे आहे.”
राजीनाम्याची धमकी
सातही मंडळांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मी स्वतः भाजपच्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देईन. कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. — मिलिंद देशकर, भाजप नेते, राजुरा
त्यांनी सांगितले की सकाळी जेव्हा रत्नाकर पचारे त्यांच्या भेटीस आले, तेव्हा त्यांनी पुन्हा आमदार भोंगळे यांच्याशी संपर्क साधला. भोंगळे यांनी त्यावेळी आश्वासन दिले की, “एकाही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही, उद्या सकाळी मी पोलिस अधिकाऱ्यांशी बोलतो.”
राजकारण व कायदा आमनेसामने
या घटनेमुळे राजकारण व कायदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विसर्जनावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उघड उल्लंघन करून डीजे सुरू करण्यात आला, हे प्रशासनाच्या नोंदीत आहे. Rajura Ganesh Visarjan DJ Case त्याच वेळी, स्थानिक राजकीय नेतृत्वाने या कृतीला थेट मान्यता दिली, याचे पुरावे स्वतः देशकर यांच्या वक्तव्यांतून पुढे आले आहेत. त्यामुळे पोलिसांनी केलेली कारवाई कायदेशीर दृष्टीने योग्य मानली जाते. परंतु कार्यकर्त्यांचा ठाम दावा आहे की त्यांनी फक्त आमदारांच्या सूचनेचे पालन केले, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे अन्यायकारक आहे.
पुढील घडामोडींकडे लक्ष
या प्रकरणावरून भाजपच्या अंतर्गत राजकारणालाही सुरुवात झाली आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला असून, पोलिसांनी सात मंडळांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत तर पक्षातील एक गट राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम राहील, हे स्पष्ट झाले आहे. Rajura Ganesh Visarjan DJ Case दुसरीकडे, पोलिस प्रशासनाने कायदेशीर चौकट मोडीत काढल्याचा आरोप टाळण्यासाठी पुढील पावले कशी उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गुन्हे पोलिसांनी मागे घेतले तर ठीक, अन्यथा मी स्वतः न्यायालयातून खारीज करवून आणीन. डीजे सुरू करण्याचे आवाहन मीच केले होते आणि माझ्यावर गुन्हा नोंदवा, असे स्पष्टपणे सांगितले होते. आमदार आम्ही डीजे वाजवायला सुरुवात केल्यानंतर बराच वेळाने आले आणि माझ्यासोबत डीजेचा आनंद घेतला. देशकर यांचा दावा जर खरा असेल तर आमदारांवरही गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या प्रकरणात कारावास किंवा फाशीची शिक्षा होणार नाही, त्यामुळे याला अनावश्यक गांभीर्य देऊ नये. — सुरज ठाकरे, काँग्रेस नेते
राजुरातील हा वाद केवळ ध्वनीप्रदूषणाचा किंवा एका उत्सवाचा मुद्दा राहिलेला नाही. हा प्रश्न आता “कायदा विरुद्ध राजकीय दबाव” असा बनला आहे. पोलिसांनी आदेशानुसार गुन्हे नोंदवले असले तरी, राजकीय नेत्यांनी त्याच प्रकरणात कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे प्रशासनाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मिलिंद देशकर यांचा राजीनाम्याचा इशारा भाजपसाठी स्थानिक पातळीवर डोकेदुखी ठरू शकतो. Rajura Ganesh Visarjan DJ Case आता पुढील पाऊल कोण उचलते — पोलिस प्रशासन आपला निर्णय कायम ठेवते की राजकीय दबावाला झुकते — यावरच राजुराच्या राजकारणातले समीकरण अवलंबून राहणार आहे.
Why were FIRs filed against the Ganesh mandals in Rajura?
Who are the accused in this case?
What was BJP leader Milind Deshkar’s response?
What do the court and government orders say about DJs during Ganesh Visarjan?
#Rajura #GaneshVisarjan #DJCase #Chandrapur #GaneshFestival #Visarjan2025 #GanpatiBappaMorya #DJBan #NoisePollution #CourtOrders #MaharashtraPolice #PoliticalControversy #BJP #FIR #Mandals #DevendraFadnavis #GaneshMandals #SupremeCourt #HighCourt #LawAndOrder #PublicOrder #GaneshUtsav #RajuraPolitics #ChandrapurNews #GanpatiVisarjan #DolbyDJ #SoundBan #FestivalRow #PoliceAction #GaneshBhakts #PoliticalDrama #GaneshMandalsCase #FIR4392025 #Section223IPC #RajuraPolice #GaneshMandalLeaders #GanpatiCelebrations #GaneshFestival2025 #CommunityRights #NoiseBan #LawViolation #BJPPolitics #ResignationThreat #PublicProtest #GaneshMandalsRajura #GaneshVisarjanProcession #CourtDirective #PoliceVsMandals #FestivalControversy #RajuraDispute #GaneshDevotees #RajuraGaneshVisarjanDJCase #MahawaniNews #RajuraNews #VeerPunekarReport #MarathiNews #Batmya #RajuraBatmya #SurajThakre #MilindDeshkar #DeoravBhongle #RajuraPolice
.png)

.png)