विहीरगाव "पाच कमानी"त बेकायदा उत्खननाचे साम्राज्य; शासनाच्या महसुलाला कोट्यवधींचा फटका
Illegal Sand Mining Rajura | राजुरा | तालुक्यातील वर्धा नदी परिसर आज एक प्रकारे रेती माफियांच्या कब्जात गेला आहे. विहीरगाव (पाच कमानी), धानोरा, आर्वी, विरूर स्टेशन आदी भागात दिवसाढवळ्या अवैध उत्खनन, वाहतूक सुरू असून शासनाच्या महसुलाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. शासनाने दिलेले परवाने केवळ रेल्वे उत्खननापुरते मर्यादित असताना, प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर रस्तेमार्गे अवैध वाहतूक केली जात आहे. या सर्व प्रक्रियेत नियम, अटी-शर्तींचा सर्रास भंग होत असून, यामागे काही स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधींचा छुपा आशीर्वाद असल्याचे आरोप ठामपणे पुढे येत आहेत.
नियमांच्या पायमल्लीचे हे उघड कारनामे प्रशासनाला ठाऊक असूनही कारवाईचा अभाव संशयास्पद ठरत आहे. अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी तक्रारी नोंदवल्या, परंतु त्याचा परिणाम शून्य राहिला. Illegal Sand Mining Rajura अंधाराच्या आड सुरू होणाऱ्या अवैध रेती वाहतुकीमुळे पाच कमानीची आणि नदीपात्राची रचना उद्ध्वस्त होत आहे, पाणीप्रवाह बदलत आहे, आणि पर्यावरणीय हानी वेगाने वाढत आहे. एवढेच नव्हे तर गावागावच्या रस्त्यांवरून धुडकावली जाणारी अवजड वाहने खोल खड्डे निर्माण करीत आहेत. विहीरगाव–पाचकमानी भेंडाळा–विरूर स्टेशन–अमृतगुडा मार्ग हा तर अक्षरशः खड्ड्यांनी विद्रुप झाला आहे. याचा फटका थेट नागरिकांना बसत असून, खासगी व शासकीय वाहतूक ठप्प झाली आहे. विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पर्यावरण आणि पुरातत्त्वीय संरक्षणाच्या दृष्टीने ज्या ठिकाणांच्या ३०० मीटर परिसरात कोणतेही उत्खनन निषिद्ध आहे, तिथेही मोकळ्या हाताने रेती उपसली जात आहे. Illegal Sand Mining Rajura नदीवरील पूल, पक्के रस्ते, ऐतिहासिक बांधकामे आणि आजूबाजूचा निसर्ग धोक्यात आला आहे. शासनाचे नियम पुस्तकी राहिले आहेत, तर जमिनीवर रेती माफियांचे राज्य पसरले आहे. यामुळे शासन यंत्रणा मुद्दाम डोळेझाक करीत आहे की दबावाखाली नाकर्तेपणा दाखवीत आहे, हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
नागरिकांच्या सततच्या आक्रोशानंतर मागेच तालुका काँग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन या अवैध कारभारावर आळा घालण्याची मागणी केली. Illegal Sand Mining Rajura त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, महसूल प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. हा इशारा केवळ औपचारिक राहणार की वास्तवात कृती होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मात्र, प्रश्न केवळ राजकीय, शासकीय दडपणाचा नाही. शासनाला मिळणारा महसूल हा सार्वजनिक विकासाच्या कामांसाठी खर्च होणारा निधी आहे. Illegal Sand Mining Rajura तो कोट्यवधी रुपयांचा महसूल अवैध मार्गाने काहींच्या खिशात जात असताना शाळा, रस्ते, रुग्णालये आणि ग्रामीण विकासाची कामे रखडत आहेत. म्हणजे रेती माफियांची तिजोरी फुलत असताना नागरिकांच्या मूलभूत गरजा वाया जात आहेत.
यंत्रणेने ‘सखोल चौकशी’ आणि ‘कठोर कारवाई’च्या घोषणा वेळोवेळी केल्या, पण प्रत्यक्षात रेतीच्या गाड्या अजूनही रात्रीच्या काळोखात गावकुसातून धाव घेत आहेत. Illegal Sand Mining Rajura जर प्रशासन खरोखरच इच्छुक असेल तर महसूल विभाग, पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा संयुक्त गट तयार करून एका आठवड्यात संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करणे अशक्य नाही. परंतु त्यासाठी लागते ती प्रामाणिक इच्छाशक्ती, जी सध्या पूर्णपणे हरवलेली दिसते.
वर्धा नदीचा हा प्रश्न फक्त राजुरा तालुक्यापुरता मर्यादित नाही; तो पर्यावरणीय संकट, ग्रामीण विकास आणि शासनाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. जेव्हा कायदेबाह्य मार्गांनी धनसंपत्ती गोळा करणाऱ्यांना मोकळीक दिली जाते, तेव्हा सामान्य नागरिकांचा कायद्यावरील विश्वास डळमळतो. Illegal Sand Mining Rajura शासनाची प्रतिमा डागाळते. यावर तातडीने लगाम लावला नाही, तर उद्या या रेती तस्करीचे दुष्परिणाम अपरिवर्तनीय स्वरूप धारण करतील.
प्रशासनाकडून पुढील काही दिवसांत ठोस कारवाई झाली नाही तर जनता उग्र पावले उचलण्यास भाग पडेल, हे निश्चित आहे. वर्धा नदीचा प्रश्न केवळ अवैध उत्खननाचा नाही; तो कायद्याचा, लोकशाहीचा आणि भविष्यातील पर्यावरणीय शाश्वततेचा प्रश्न आहे. Illegal Sand Mining Rajura आणि या प्रश्नाला आता चुकवणे प्रशासनाला मुळीच परवडणार नाही.
Where is the illegal sand mining taking place?
What loss is the government suffering due to this mining?
How is illegal sand mining affecting local people?
What action has been demanded against the sand mafia?
#IllegalSandMiningRajura #IllegalSandMining #Rajura #WardhaRiver #SandMafia #RevenueLoss #EnvironmentalDamage #SaveRivers #StopSandMafia #RajuraNews #WardhaNews #SandSmuggling #Chandrapur #IllegalMining #ProtectNature #SaveWardhaRiver #MiningScam #SandMafiaExposed #RajuraTaluka #VillageStruggle #SandLoot #PublicOutcry #MiningCrisis #IllegalSandTrade #WardhaCrisis #RajuraVoice #RiverPlunder #MiningMafia #StopIllegalMining #RajuraUpdates #PeopleVsMafia #EnvironmentalCrisis #SandLooting #ProtectEnvironment #RajuraProtest #IllegalMiningAlert #WardhaRiverCrisis #SandScam #RajuraIssues #MiningLoot #SaveEnvironment #RajuraBuzz #WardhaLoot #StopSandSmuggling #RajuraSandCrisis #MiningNews #SandCrisis #RajuraMatters #WardhaUpdates #MafiaPolitics #RajuraAlert #StopLootingRivers #RajuraNews #VihirgaonNews #MarathiNews #VeerPunekarReport #Batmya
.png)

.png)