Sasti Liquor License Scam | दारू परवान्यात बहिणींना वारसाहक्कातून हुसकावून, दोन भावांचा बनावट खेळ

Mahawani
0
Photograph showing the State Excise Department and Channe Desi Liquor Shop

राजुरा उत्पादन शुल्क विभागात बडे मिया–छोटे मियांचा भ्रष्टाचार? पोलिसांच्या रडारवर अधिकारी, फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल

Sasti Liquor License Scam | राजुरा | कायद्याचा गाजावाजा करणारे आदेश, GR, नियमावली हे सर्व सामान्य नागरिकांच्या डोक्यावर गदा म्हणून कोसळतात, पण सरकारी विभागातील काही अधिकाऱ्यांसाठी ते फक्त धुळखात पडलेले कागद असतात. शिस्त, कायदेशीर पडताळणी आणि पारदर्शक प्रक्रिया यांचा बोंब ठोकत काही अधिकारी स्वतःच्या खिशासाठी नियमांचे राडे करतात, आणि सरकारच्या आदेशाला जाहीरपणे ठेंगा दाखवतात. अशाच धक्कादायक प्रकारात राजुरा तहसीलातील सास्ती येथे दोन भावंडांनी बहिणींना वारसहक्कातून बाहेर टाकत, बनावट कागदपत्रे आणि खोट्या सह्या करून CL-3 देशी दारू परवाना सन-२०२५-२६ साठी नूतन करून घेतला आहे. यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक आणि दुय्यम निरीक्षक यांचे थेट संगनमत असल्याचे स्पष्ट होत आहे.


हा परवाना मे. जे. टी. चन्ने अनुग्याप्ती CL-III सास्ती या नावाने मंजूर असून मूळ अनुग्याप्ती धारकाच्या निधनानंतर (२७ एप्रिल २०२१) यात तीन भाऊ आणि तीन बहिणी असा सहा जणांचा वारसा हक्क आहे. Sasti Liquor License Scam परंतु नूतनीकरण प्रक्रियेत २४ ऑक्टोबर २०१८ रोजीच राज्य उत्पादन शुल्क आयुक्त (डॉ. अश्विनी जोशी) यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे की, CL-3 व FL-2 अनुज्ञप्त्यांचे नुतनीकरण करताना सर्व भागीदार / वारसदार प्रत्यक्ष हजर राहून, ओळखपत्र दाखवून, अर्जावर स्वाक्षरी करणे बंधनकारक असतानाही अधिकाऱ्यांनी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. बनावट सही आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे दोन भावंडांना थेट वारसदार ठरवत हा परवाना नूतनीकरण करण्यात आल्याचे आरोप सौ. सुनिता खामनकर (चन्ने) यांनी लावले आहे. राजुरा राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक अभिनंदन कांबळे आणि दुय्यम निरीक्षक अतुल भिवगडे यांनी यासाठी लाखोंचा व्यवहार? केल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.



हा परवाना सहा महिन्यांपूर्वी नूतनीकरण मंजुरीसाठी चंद्रपूर येथील आयुक्त राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडे मंजुरीचा अहवाल पाठवून मंजूर करण्यात आला. Sasti Liquor License Scam परंतु प्रत्यक्षात ज्यांचा वारसाहक्क होता त्या बहिणींची यात उपस्थितीच नव्हती. त्यामुळे हे प्रकरण बाहेर आल्यानंतर संपूर्ण व्यवहाराचा फुगा फुटला आहे.


दरम्यान, या फसवणुकीविरुद्ध वारसहक्कातून डावललेल्या सौ. सुनिता खामनकर (चन्ने) यांनी थेट राजुरा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीवरून सचिन जगन्नाथ चन्ने आणि भाऊराव जगन्नाथ चन्ने या दोन्ही भावाविरुद्ध खोटे कागदपत्रे तयार करणे आणि फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.


या प्रकरणाने राज्य उत्पादन शुल्क विभागाची काळी बाजू पुन्हा एकदा उघड केली आहे. कधी अवैध वसुली, कधी बनावट परवाने, कधी भ्रष्टाचाराच्या डोंगराएवढ्या आरोपांनी हा विभाग नेहमीच चर्चेत राहिला आहे. Sasti Liquor License Scam राजुरातील निरीक्षक अभिनंदन कांबळे आणि दुय्यम निरीक्षक अतुल भिवगडे यांचे नाव तर स्थानिकांमध्ये “बडे मिया-छोटे मिया” म्हणून कुप्रसिद्ध आहे. पोलिस तपासात या दोघांनी प्रत्यक्ष वस्तुस्थिती माहिती असतानाही आरोपींना मदत केल्याचे संकेत मिळाले आहेत.


तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षण गोविंद चाटे यांनी या प्रकरणात बारकाईने तपास सुरू केला आहे. त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागातील दोन्ही अधिकाऱ्यांना थेट विचारणा केली असता त्यांनी गोलमोल उत्तरे देत पोलिसांना फसविण्याचा प्रयत्न केला. Sasti Liquor License Scam परंतु पोलिसांनी आता कायदेशीर खाक्या दाखवण्याचे ठरवले असून, या अधिकाऱ्यांना तीन दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण देण्याचे अल्टीमेटम देण्यात आले होते ज्यात देखील संबंधित विषयाला सोडून भलतेच  उडवाउडवीची उत्तर देण्यतात आल्याने पोलीस प्रशासन अधिक रोषात आले आहे. 


या अल्टीमेटममध्ये तीन ठळक प्रश्न विचारण्यात आले आहेत.

  • पहिला – आपण 2018 च्या GR नुसार वारसांची पडताळणी केली का? केली असेल तर ती कशी?
  • दुसरा – CL-3 परवान्यासाठी नियमावली आणि गाईडलाईनप्रमाणे तपासणी का झाली नाही?
  • तिसरा – आपण या गुन्ह्यात आरोपी ठरू नये यासाठी कोणते लेखी पुरावे सादर करणार?

या प्रश्नांची उत्तरे देणे अधिकाऱ्यांसाठी धोक्याचे ठरणार आहे. कारण त्यांच्या संगनमताचे पुरावे आधीच पोलिसांच्या हातात लागल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.


याचदरम्यान, भ्रष्टाचाराच्या वासाने पूर्ण विभाग घेरला आहे. वसुलीचे आकडे थांबत नाहीत. परवाना नूतनीकरणाच्या गोंधळातही निरीक्षकांनी आपला ‘कोटा’ पूर्ण केल्याची बातमी बाहेर आली आहे. ऑगस्टपर्यंत लाखो रुपयांची अवैध वसुली गळ्यात पडल्याचे सांगितले जाते. Sasti Liquor License Scam एवढेच नव्हे तर दोन नवीन प्रपोजल पास आऊट करण्यासाठी लाखोंच्या घरात  रुपयांची तोडणी झाल्याची चर्चा आहे.


सरकार सतत आदेश, GR आणि नियमावली जाहीर करत असते. पण हे सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तिजोरीसमोर निष्प्रभ ठरतात. वारसाहक्काने बहिणींना असलेला हक्क बोटांच्या एका इशाऱ्याने हिसकावून घेता येतो, कारण कायद्याचा डोरखंड अधिकारी आणि भ्रष्ट पैशांनी ओढला जातो. Sasti Liquor License Scam सामान्य नागरिकांच्या घामाने बनलेला पैसा आणि न्यायाच्या नावाखाली केलेली फसवणूक हीच खरी या घटनेची भीषण कहाणी आहे.


राजुरा पोलीस तपासात जर हे प्रकरण पूर्णतः उघडकीस आले तर राज्य उत्पादन शुल्क विभागातील “बडे मिया–छोटे मिया” जोडीवर गदा कोसळण्याची चिन्हे आहेत. मात्र प्रश्न असा आहे की, इतक्या वर्षांच्या वसुली आणि भ्रष्टाचाराच्या साम्राज्यावर शेवटचा घाव खरोखरच बसणार का? की पुन्हा एखाद्या ‘मॅनेजमेंट’च्या छत्रीत हे प्रकरण दाबले जाणार?


लोकशाहीत कायदा सर्वोच्च आहे असे म्हणतात. पण राजुराच्या या प्रकरणाने दाखवून दिले आहे की कायदा कागदावर आणि भ्रष्टाचार प्रत्यक्ष व्यवहारावर राज्य करतो. Sasti Liquor License Scam या दोन भावांनी बहिणींना वारसाहक्कातून डावलून केलेला खेळ हा फक्त दारूच्या परवान्यासाठी नाही, तर कायद्याला केलेला थेट अपमान आहे. आणि या अपमानाला मूक साक्षीदार राहणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी जनतेसमोर ठळकपणे उभी राहते.


What is the Rajura liquor license scam about?
It involves two brothers allegedly forging documents and signatures to exclude their sisters from inheritance and secure a CL-3 liquor license with the help of excise officials.
Who are the accused in the Rajura liquor license scam?
Sachin Jagganath Channe and Bhaurao Jagganath Channe are accused of fraudulently obtaining the license, along with suspected collusion from excise officials.
Which officials are under investigation in this case?
Excise Inspector Abhinandan Kamble and Sub-Inspector Atul Bhivgade from Rajura are being probed for approving the license despite legal violations.
What action has the police taken so far?
Rajura Police have registered a fraud case, begun investigation, questioned excise officials, and issued an ultimatum for written clarification within three days.


#RajuraLiquorLicenseScam #SastiLiquorLicenseScam #RajuraScam #LiquorLicenseFraud #ChandrapurNews #CorruptionExposed #PoliceInvestigation #CL3License #JusticeForSisters #FraudCase #FakeDocuments #RajuraNews #BreakingNews #ScamAlert #StopCorruption #MaharashtraNews #InheritanceRights #SastiVillage #CorruptOfficials #ScamExposed #RajuraUpdates #TruthPrevails #CorruptionScandal #PoliceAction #RajuraPolice #FraudExposed #SistersRights #JusticeMatters #FakeSignatures #RajuraCorruption #LicenseScam #PoliceInvestigationOngoing #RajuraUpdatesLive #BreakingRajura #StopFraud #ExposeCorruption #RajuraTruth #CL3Scam #RajuraDistrict #LiquorFraud #RajuraInvestigation #ScamUncovered #PoliceProbe #ChandrapurUpdates #RajuraSensation #CorruptionAlert #RajuraFraudCase #ExposeTheTruth #JusticeInRajura #ScamInRajura #FraudInvestigation #RajuraBreakingNews #RajuraWatch #MahawaniNews #sastiNews #VeerPunekarReport #MHEXCISE #MarathiNews #Batmya #AbhinandanKamble #AtulBhivagade #GovindChate 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top