Chandrapur MD Drugs Raid | रहमतनगरात ‘एम.डी.’ जाळं उघडं, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Mahawani
0
Photograph of the accused along with the Local Crime Branch, Chandrapur and Ramnagar Police.

कुख्यात गुन्हेगाराच्या घरावर छापा; ५७ ग्रॅमपेक्षा जास्त मॅफेड्रॉन जप्त, एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल

Chandrapur MD Drugs Raid | चंद्रपूर | जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध सुरु असलेल्या धडक मोहिमेने पुन्हा एकदा गुन्हेगारी जगतात खळबळ माजवली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रहमतनगर परिसरात थेट छापा टाकून मॅफेड्रॉन (एम.डी.) या घातक अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला. ५७.२६० ग्रॅम एवढ्या धोकादायक पदार्थासह एकूण चार लाख एकोणीस हजार एकशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


२२ ऑगस्ट २०२५ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, रहमतनगरात राहणारा कुख्यात व पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहम्मद शादाब अब्दुल रऊफ शेख आपल्या घरीच एम.डी. पावडर विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याची खात्री झाली. Chandrapur MD Drugs Raid संध्याकाळच्या सुमारास सापळा रचून पंचासमक्ष व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोपीच्या घरावर छापा घालण्यात आला. छाप्यात आरोपीकडून ५७ ग्रॅमपेक्षा जास्त एम.डी. पावडर हस्तगत झाली. बाजारभावानुसार या पदार्थाची किंमत तब्बल चार लाखाहून अधिक असल्याचे उघड झाले.


या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ कलम ८(क), २१(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे. आरोपी शादाब हा आधीपासूनच धोकादायक गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. त्याच्या ताब्यात एवढा मोठा अंमली पदार्थ आढळल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारीचे नवे पैलू पुढे आले आहेत.


या मोहिमेचे यशस्वी नियोजन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या थेट मार्गदर्शनाखाली झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे, रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. आसिफराजा शेख, सपोनि श्री. दीपक कांक्रेडवार, श्री. बलराम झाडोकार, श्री. निलेश वाघमारे, श्री. देवाजी नरोटे यांच्यासह पोउपनि श्री. विनोद भुरले, श्री. सुनिल गौरकार, श्री. सर्वेश बेलसरे व इतर अनेक अधिकाऱ्यांनी थेट सहभाग नोंदवला. सफौ. स्वामीदास चालेकर, पोहवा प्रकाश बल्की, सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठ्ठावार, सतिश अवथरे, दिपक डोंगरे, इमरान खान, किशोर वैरागडे, अजय बागेसर, लालु यादव, बाबा नैताम तसेच महिला अधिकारी उषा लेडांगे, विजयमाला वाघमारे, दीपिका सोडनार, निराशा तितरे, अर्पणा मानकर यांचेही या कारवाईत योगदान राहिले. Chandrapur MD Drugs Raid इतक्या मोठ्या संख्येने अधिकारी व अंमलदारांनी सहभागी होऊन केलेल्या या मोहिमेने चंद्रपूर पोलिसांची सजगता अधोरेखित झाली आहे.


Passport Style Photo

अवैध अंमली पदार्थांची विक्री व सेवन ही समाजासाठी विषासमान असल्याचे स्पष्ट करताना पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना थेट आवाहन केले आहे. Chandrapur MD Drugs Raid युवकांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या या काळ्या बाजारातील साखळीचा पूर्णतः नायनाट करणे आवश्यक असून यात प्रत्येक नागरिकाने पोलीसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. संशयास्पद हालचाली वा व्यक्ती दिसल्यास त्वरित ७८८७८९०१०० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर माहिती द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.


चंद्रपूर शहरातील रहमतनगर सारख्या गजबजलेल्या भागात थेट गुन्हेगाराच्या घरातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर एम.डी. पावडर जप्त होणे हे समाजाच्या सुरक्षिततेसाठी गंभीर इशारा आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी पोलिसांनी अशा प्रकारचे धाडसी पाऊल उचलणे केवळ प्रशंसनीयच नाही तर अनिवार्यही आहे. अंमली पदार्थाच्या व्यसनात अडकलेले असंख्य तरुण जीवनाच्या अंधाऱ्या दरीत ढकलले जातात. Chandrapur MD Drugs Raid त्यांच्या आयुष्याचे दिवे विझू नयेत, त्यांच्या हातात बंदुकीऐवजी पुस्तके यावीत, यासाठीच अशा कारवाया काळाची हाक बनल्या आहेत.


चंद्रपूर पोलिसांनी दिलेला हा संदेश स्पष्ट आहे – अवैध धंद्यांचा अंत अपरिहार्य आहे. Chandrapur MD Drugs Raid गुन्हेगारीला पाळंमुळं घालणाऱ्यांविरुद्ध आता कठोर कारवाई होणारच. जनता सजग राहील, पोलीस कणखर राहतील आणि प्रशासन जागरूक राहील, तर अंमली पदार्थांचा हा विषारी डंख नक्कीच मोडला जाईल.


What exactly happened in Rahmatnagar, Chandrapur?
Chandrapur police raided a notorious criminal’s house in Rahmatnagar and seized 57.260g of MD drugs worth ₹4.19 lakh.
Under which law was the case registered?
The case was registered under the NDPS Act, 1985, Sections 8(c) and 21(c).
Who led the operation against the drug racket?
The operation was led by Chandrapur SP Mummaka Sudarshan, Additional SP Ishwar Katkade, and Local Crime Branch Inspector Amol Kachore with Ramnagar Police.
How can citizens help police in controlling drug crimes?
Citizens are urged to report any suspicious activity related to drugs directly on Chandrapur Police WhatsApp helpline 7887890100.


#Chandrapur #PoliceAction #MDDRugs #NDPSAct #DrugRaid #StopDrugs #ChandrapurNews #WarOnDrugs #PoliceCrackdown #DrugFreeIndia #Rahmatnagar #ChandrapurPolice #DrugSeizure #CrimeNews #MDDRugsSeized #NoToDrugs #AntiNarcotics #YouthAwareness #DrugAbuse #DrugsKill #ChandrapurUpdates #SafeSociety #FightDrugs #BreakingNews #DrugBust #MDDRugsRaid #IllegalTrade #PoliceSuccess #DrugCrime #LawAndOrder #MajorSeizure #ChandrapurUpdates #ZeroTolerance #DrugFreeSociety #SayNoToDrugs #PoliceAlert #DrugCartel #JusticeServed #CrimeControl #NDPSActRaid #YouthSafety #DrugsAwareness #PoliceDuty #StopDrugMafia #CommunitySafety #DrugFreeMaharashtra #CrimePatrol #PoliceAlertness #DrugTrafficking #ChandrapurBreaking #FightAgainstDrugs #MahawaniNews #VeerPunekarReport #ChandrapurNews #ShadabKhan #DrugsNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top