बल्लारपूरात राहुल गांधींच्या आरोपांना पाठिंबा देत जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम व मोर्चा; तहसीलदारामार्फत राष्ट्रपतींना निवेदन
Ballarpur Congress Protest | बल्लारपूर | लोकशाहीच्या मूळ गाभ्याला हादरा देणारा आणि मतदारांच्या विश्वासाला तडा देणारा आरोप काँग्रेसने आज बल्लारपूरच्या रस्त्यावर उतरून उघडपणे फोडला. लोकसभा निवडणुका आणि त्यानंतरच्या महाराष्ट्रासह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने भाजप सरकारच्या हाताशी हात घालून मतदार यादीत घोटाळा केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशासमोर केला. पक्षाच्या मते, हा कट विरोधी पक्षांच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी रचला गेला होता.
राहुल गांधींच्या या उघडकीनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार बल्लारपूर शहर काँग्रेस व तालुका काँग्रेसतर्फे १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नगरपालिका चौकात स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. येथून निदर्शने व निषेधाचा आवाज आकाशाला भिडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रदेश काँग्रेसचे सचिव घनश्याम मूलचंदानी, प्रदेश प्रतिनिधी डॉ. रजनी ताई हजारे, शहराध्यक्ष देवेंद्र आर्य, तालुकाध्यक्ष गोविंदा उपरे, माजी नगराध्यक्ष डॉ. मधुकर बावणे, छायाताई मडावी, सुनंदा आत्राम, भास्कर माकोडे, माजी उपाध्यक्ष डॉ. सुनिल कुल्दीवार, सुरेश गलानी, महिला काँग्रेस अध्यक्षा अफसाना सैय्यद, मेघा भाले, प्रा. अनिल वाग्दरकर, प्राणेश अमराज, इस्माईल ढाकवाला, नरेश मुंदडा, सत्यशिला साळवे, पवन मेश्राम यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत हजेरी लावली. Ballarpur Congress Protest स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झालेल्या नेत्यांनी जनतेला संबोधित करत, मतदार याद्यांतील फेरफार हा लोकशाहीवरील सरळ हल्ला असल्याचा आरोप केला आणि लोकांनी अशा सत्ताधाऱ्यांना सत्तेतून हद्दपार करण्याची प्रतिज्ञा करावी, असे आवाहन केले.
यानंतर घोषणा देत, निषेधाचा स्वर अधिक तीव्र करत तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे पाऊल पुढे सरकताच शहरातील रस्ते ‘मतदार घोटाळा बंद करा’ अशा आरोळ्यांनी दुमदुमले. Ballarpur Congress Protest मोर्चाच्या शेवटी तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्या मार्फत राष्ट्रपतींना सविस्तर निवेदन पाठविण्यात आले, ज्यात मतदार यादीतील फेरफार प्रकरणाची सर्वोच्च पातळीवर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिल खरतड, नाना बुंदेल, कासिम शेख, ऍड. सैय्यद, प्रितम पाटील, मेहमूद पठान, रेखा रामटेके, नरेश आनंद, मंगेश बावणे, बाबूभाई, सुरेश बोप्पनवार, लखपती घुगलोत, वर्षा दानव, सुनिता वाघमारे, खुशाल कोरडे, अंकूबाई भूक्या, विठाबाई बावणे, विनोद आत्राम, शिवबचन, करण कामटे, फारुख खान, रोहित चूटे, अक्षय मानूसमारे, लियाकत अली, कार्तिक जिवतोडे, प्रदीप झाडे, विनायक वाढई, धर्मा महाकाली, चंदू वाढई, रक्षित कृष्णापल्ली, रोनित गलगट, प्रफुल्ल बोप्पणवार, बाबुराव परसुटकर, अनील गेडाम, सुरेश चहारे, अरुण पेंदोर, सुनिल कोहळे, मंगेश ढोके, पंकज राठोड यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन नरेश मुंदडा यांनी केले. Ballarpur Congress Protest बल्लारपूरातील या संतप्त निदर्शनाने स्थानिक राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, मतदार याद्यांतील घोटाळा प्रकरणावर आता जिल्ह्यातील जनतेचे लक्ष केंद्रीत झाले आहे. काँग्रेसने या लढ्याची गाज पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार जाहीर केला असून, लोकशाहीवरील प्रत्येक वाराला रस्त्यावर उतरून प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा देत हा मोर्चा संपन्न झाला.
Why did Congress protest in Ballarpur?
Who led the Ballarpur protest?
What actions were taken during the protest?
What is Congress demanding from the government?
#BallarpurCongressProtest #Ballarpur #CongressProtest #VoterListScam #RahulGandhi #ElectionFraud #SaveDemocracy #BallarpurNews #CongressMarch #TehsilOfficeProtest #MemorandumToPresident #MaharashtraPolitics #PoliticalScandal #VoterRights #OppositionUnite #DemocracyUnderThreat #ElectionManipulation #BallarpurUpdates #CongressRally #MaharashtraCongress #BallarpurLive #PoliticalProtest #JusticeForVoters #ElectionCommission #BallarpurCity #PoliticalAwareness #TruthForIndia #VoterListFraud #CongressSupport #PoliticalActivism #DemocracyFirst #BallarpurEvent #OppositionVoice #ProtestForJustice #CongressMovement #MaharashtraNews #BreakingNews #BallarpurUpdate #ProtestMarch #PoliticalNewsIndia #VoterAwareness #OppositionProtest #IndiaPolitics #PoliticalNews #CongressCampaign #JusticeMarch #SaveVoterRights #IndiaDemocracy #BallarpurRally #PeoplePower #TruthWillPrevail #MahawaniNews #marathiNews #BallarpurNews #VeerPunekarReport #Batmya