आमसभेतील ठराव रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा, पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका
Card Room Opposition | राजुरा | मौजा टेंबुरवाही येथील ग्रामस्थांनी काल दिनांक. २१ जुलै रोजी राजुरा येथील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत गावात प्रस्तावित असलेल्या प्लेइंग कार्ड रूम (रम्मी क्लब) स्थापन करण्याच्या हालचालींविरोधात आपला तीव्र आक्रोश नोंदवत, दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी घेतलेली ग्रामसभा बेकायदेशीर ठरवत ती तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा गावकरी जनता रस्त्यावर उतरेल आणि यामुळे उद्भवणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीला प्रशासनच जबाबदार राहील, असा ठणकाव इशारा यावेळी देण्यात आला.
टेंबुरवाहीसह आसपासचे गाव म्हणजे महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगतचे अतिसंवेदनशील भाग मानले जातात. तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यांत रम्मीसह अनेक प्रकारचे जुगार खेळणे कायदेशीर बंदीच्या कक्षेत येते. त्यामुळे या राज्यांतील काही बड्या गुन्हेगारी गटांकडून सीमेलगतच्या गावांमध्ये जुगार क्लब सुरू करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मौजा तुलाना येथील ‘साई बैठक’ हॉटेलमध्ये रम्मी क्लब उभारण्याचा प्रयत्न काही मंडळींनी सुरू केला असून, संबंधितांकडून प्लेइंग कार्ड परवान्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र (NOC) मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या प्रस्तावास गावकऱ्यांनी आमसभेत स्पष्ट आणि एकमुखी विरोध दर्शवला होता. Card Room Opposition विषय क्र. ४ - प्लेइंग कार्डसाठी नाहरकत देणे या प्रस्तावावरील चर्चेवेळी ग्रामसेवक व सरपंच यांनी विषय मागे घेण्याचे आश्वासन दिले होते, अशी माहिती गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मात्र त्यानंतर दिनांक २९/०४/२०२५ रोजी गावात असलेल्या मुख्यालयाऐवजी गट ग्रामपंचायत तुलाना येथे चोरीछुप्या पद्धतीने सभा घेण्यात आली आणि संबंधित कार्ड रूमसाठी नाहरकत प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले. यास ग्रामसभेचा निर्णय व नागरिकांचा विरोध असूनही मंजुरी दिली गेल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनावर आर्थिक संगनमताचे आरोप होत आहेत.
गावातील वातावरण बिघडण्याची भीती
प्रस्तावित कार्ड रूम हे गावालगत आहे आणि त्याठिकाणी स्थानिक रहिवासी, विद्यार्थी, महिलांची सतत वर्दळ असते. त्यामुळे जुगार क्लब सुरू झाल्यास गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होण्याची शक्यता आहे, असे मत अर्जदारांनी व्यक्त केले. Card Room Opposition ग्रामीण भागात प्लेइंग कार्ड रूमचा कोणताही सामाजिक, आर्थिक अथवा शैक्षणिक उपयोग नाही. उलट त्याचा दुरुपयोग होऊन अवैध धंद्यांना खतपाणी घातले जाईल.
अधिकाऱ्यांवर सडेतोड आरोप
ग्रामसेवक व सरपंच यांनी कार्ड रूम धारकांशी संगनमत करून आपला आर्थिक फायदा साधण्यासाठी बेकायदेशीर पद्धतीने ठराव मंजूर केला, असा गंभीर आरोप अर्जात करण्यात आला आहे. Card Room Opposition यामुळे संपूर्ण प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात असून, संबंधित ठराव तत्काळ रद्द करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.
पत्रकार परिषदेत उपस्थित व हस्ताक्षरित विरोध करणार राणी चेतन जयपुरकर, सदस्य ग्रा.पं. टेंबुरवाही, प्रतिभा रघुनाथ गेडाम, सदस्य, किरण नितीन इष्टाम, सदस्य, विनोद कुळसंगे, सदस्य, चेतन गणपती जयपुर, माजी उपसरपंच, मिथुन भंडारे, अंकुश मंडएकर, भावना भडावी, नंदा गेडाम, सौ. भावना मडावी यांनी अर्जात स्पष्ट नमूद केले आले आहे की, जर हा ठराव आणि NOC मागे घेतली गेली नाही, तर गावकरी जनता मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरेल. Card Room Opposition यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.
ग्रामस्थांचा विरोध पाहता हा प्रस्ताव जनतेच्या हिताविरोधी असून, तात्काळ रद्दबातल ठरवावा, अशी मागणी आता तीव्र होत आहे.
What is the main issue raised by the villagers of Temburwahi?
Why are villagers concerned about the establishment of a card room?
What was irregular about the Gram Sabha meeting on April 29, 2025?
What action are the villagers demanding from the authorities?
#TemburwahiCardRoomOpposition #Temburwahi #CardRoomOpposition #GramSabhaControversy #IllegalNOC #RummyBan #VillageSafety #YouthAddictionRisk #NoToGambling #TemburwahiProtest #CancelNOC #ZPChandrapur #RuralVoices #TemburwahiSpeaks #SayNoToCardRooms #ProtectOurYouth #GramPanchayatFraud #NoMoreRummy #LocalGovernanceFailure #PublicResistance #StopIllegalClubs #TemburwahiNews #RajuraUpdate #ChandrapurAlert #GramSabhaRights #GrassrootsMovement #TemburwahiRising #PublicAwareness #VillageDemands #CommunityUnity #IllegalGamblingAlert #YouthAtRisk #NoRummyHere #FightForJustice #RuralIndiaSpeaks #CorruptLeadership #ExposeWrongdoing #AccountabilityMatters #PublicPetition #ChandrapurDistrict #GamblingThreat #TemburwahiVoice #WakeUpAuthorities #VoiceOfThePeople #StopCardClubs #RuralProtest #ActionAgainstIllegalNOC #GrassrootsActivism #ProtectVillageCulture #NOCControversy #ZPInterventionNow #SaiBaithak #RaniChetanJaipurkar #PratibhaRaghunathGedam #KiranNitinIshtam #VinodKulsange #ChetanGanapatiJaipurkar #MithunBhandare #AnkushMandaykar #BhavanaBhadavi #NandaGedam #BhavanaMadavi