वेकोली खाणपट्ट्यात कोळसा, डिझेल, केबल चोरीने थैमान
राजुरा | तालुक्यातील सास्ती, गौरी, पवनी, कोलगाव परिसरात कोळसा खाण उद्योगामुळे गुन्हेगारीचं सावट गेली अनेक वर्षं पसरलेलं आहे. या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी सास्ती येथे पोलिस उपकेंद्र स्थापन करण्यात आलं होतं. एक उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि काही कर्मचारी नेमले गेले. Sasti Police Outpost कार्यालय उभारण्यात आलं. पण वास्तव काय? मागील संपूर्ण वर्षभरापासून ही चौकी बंद आहे. कारण? 'कर्मचारी अपुरे आहेत' – हे नेहमीचं उत्तर. पण हा केवळ बहाणा आहे की चालू प्रशासनाची अपयशाची कबुली?
वेकोलीच्या खाणींमधून शेकडो टन कोळसा दररोज चोरीला जातो. डिझेल आणि महागड्या केबल्सचा हिशोबच नाही. हा सारा माल राजुरा, गडचांदूर, बल्लारपूरच्या स्क्रॅप विक्रेत्यांपर्यंत पोहोचतो. Sasti Police Outpost खुल्या रस्त्यावर कोळशाचा साठा केला जातो, डिझेल सर्रास विकलं जातं, आणि तरीही पोलिस विभाग कारवाई करण्यात अपयशी ठरतो. एक-दोन चोरीच्या घटनांत काही माल हस्तगत झाला, पण गुन्हेगार? ते नेहमीच पोलिसांच्या हाती लागण्याऐवजी राजरोस हिंडताना दिसतात.
'शोभेची चौकी'; प्रशासनाला प्रश्नचिन्ह
सास्ती पोलिस चौकी ज्या उद्देशाने स्थापन झाली होती, तो उद्देश पाराच गेलाय. गुन्हेगारीला रोखण्याऐवजी ही चौकी आता नुसती दर्शनी बनली आहे. Sasti Police Outpost कर्मचारी राजुरा मुख्य पोलिस ठाण्यात बसून खाणपट्ट्याच्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. हे म्हणजे उंटावरून शेळी हाकण्यासारखं आहे. नुकतेच सास्ती येते दिवसा ढवळ्या एका गुन्हेगारी कृत्यात गुंतलेल्या युवकाची निर्घृण हत्त्या करण्यात आली. तरीही प्रशासनाला जाग आली नाही. चौकी उघडण्यासाठी प्रशासन पुन्हा किती बळी मागणार आहे. असा संतप्त सवाल स्थानिकांनी विचारला आहे.
गंभीर बाब म्हणजे, याच पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्यांवर यापूर्वी 'अवैध व्यवसायांना पाठीशी घालण्याचे' आरोप झाले होते. Sasti Police Outpost मग जनता असा सवाल का करू नये की ‘कुंपणच शेत खातंय’? ह्या निर्णयामागे कोणता दबाव, कोणाची ढाल, कोणाचे हितसंबंध आहेत?
दादागिरी, दारू विक्री आणि पोलिसांची दुर्लक्षवृत्ती
परिसरातील एक प्रमुख समस्या म्हणजे परप्रांतीय गुन्हेगारी टोळ्यांची दादागिरी. वेकोली खाण परिसरात यांचा सत्ताधिकार सर्रास वाढतोय. गावकरी भयभीत आहेत, पण पोलिस विभाग मात्र या प्रश्नावर मौन आहे. Sasti Police Outpost गोवरी गावातील महिलांनी अवैध दारू विक्रीविरोधात वारंवार आवाज उठवला. थेट पोलिस स्टेशनवर धडक दिल्या. तरी कारवाई शून्य. महिला आंदोलन करतात, माध्यमांतून आवाज उठवतात, पण पोलिस विभाग केवळ तोंडी आश्वासनं देतो.
शाळकरी मुलं, तरुण गुन्हेगारीच्या विळख्यात
या परिसरातील मोठा धोका म्हणजे शाळकरी वयातील मुलं आणि तरुण अवैध व्यवसायात ओढले जात आहेत. कोळसा, डिझेल, स्क्रॅपची स्मगलिंग, दारू विक्री — हे सगळं ‘करियर’ म्हणून समोर येतंय. हे रोखण्याची जबाबदारी कोणाची? प्रशासन, पोलिस, की पुन्हा नागरिकांची?
परिविक्षाधीन अधिकारी निष्क्रिय?
नुकतेच परिविक्षाधीन अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. आशा होत्या की या नियुक्तीमुळे तरी सास्ती पोलिस चौकीला नवा श्वास मिळेल. Sasti Police Outpost पण परिस्थितीत फरक कुठेच जाणवत नाही. सगळं 'जसंच्या तसं'. अधिकाऱ्यांचे काम केवळ कार्यालयीन ‘फाईल’ पर्यंत मर्यादित आहे का? की जाणीवपूर्वक दुर्लक्ष सुरू आहे?
जबाबदारी टाळणं थांबवा!
सध्या सास्ती पोलिस चौकी ही 'शोभेची बाहुली' बनली आहे. कायद्याचा धाक नाही, कारवाई नाही, तपास नाही, चौकशी नाही. यामुळे गुन्हेगार बेधडक बनले आहेत. प्रशासनाने, विशेषतः पोलिस विभागाने या निष्क्रियतेवर उत्तर द्यायलाच हवं.
- का ही चौकी वर्षभर बंद आहे?
- कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याबाबत कोणतीही हालचाल का नाही?
- गुन्हेगारीच्या टोळ्यांवर कारवाई का होत नाही?
- महिलांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का?
- दोषींना वाचवण्यासाठीच ही खेळी आहे का?
सास्ती पोलिस चौकी तात्काळ सुरु झाली पाहिजे. पूर्ण वेळ कर्मचारी तैनात झाले पाहिजेत. कोळसा, डिझेल, केबल, दारू यांच्या अवैध व्यवहारावर धडक कारवाई झाली पाहिजे. Sasti Police Outpost अन्यथा, लवकरच या परिसरात एखादी मोठी दुर्घटना घडली तरी जबाबदारी कोणाची असेल? याची जबाबदारी थेट पोलिस प्रशासनावरच राहील.
नागरिकांच्या संयमाची परीक्षाच सुरू आहे. आता अधिक वेळ गेल्यास, जनतेचा आक्रोश रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
Why is the Sasti Police Outpost shut despite being a sensitive crime-prone zone?
What illegal activities are rampant in the WCL coal mining region near Sasti?
How are locals responding to the police inaction?
What is the demand of the local community regarding the Sasti Police Outpost?
#SastiPoliceOutpost #CoalMafia #IllegalCoalTrade #WCLTheft #RajuraCrime #ChandrapurNews #PoliceNegligence #MaharashtraCrime #LawAndOrder #CriminalNexus #DieselTheft #CableTheft #LiquorMafia #ChandrapurPolice #InactivePolicePost #PublicOutrage #CoalMafiaNexus #MiningCorruption #WCLScam #ChandrapurDistrict #RajuraUpdates #LocalCrimeNews #SilentAdministration #PoliceAccountability #PublicDemand #CrimeWatch #CoalSmuggling #IllegalActivities #UncontrolledCrime #ShutdownPoliceChowki #CorruptionUncovered #ChandrapurBuzz #NoLawZone #YouthInCrime #IgnoredComplaints #FakePolicing #WomenProtest #LiquorSale #GrassrootJournalism #ExposeTheTruth #DemandJustice #PoliceReform #SastiUpdates #MiningMafia #NeglectOfDuty #LawFailure #LocalVoices #MaharashtraAlert #SastiAreaNews #WakeUpPolice