अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कडून २०२४ विधानसभा उमेदवारांची घोषणा
संग्रहित छायाचित्र |
नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाने यादीत प्रचलित आणि अनुभवी नेत्यांचा समावेश करून सत्ताधारी पक्षांवर कडवी टक्कर देण्याची तयारी दाखवली आहे.
प्रमुख उमेदवार आणि मतदारसंघ
- नाना पटोले – साकोली
- विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी
- बाळासाहेब थोरात – संगमनेर
- प्रितीविराज चव्हाण – कराड दक्षिण
- अमित देशमुख – लातूर शहर
- यशोमती ठाकूर – तिवसा
- रुतुराज पाटील – कोल्हापूर दक्षिण
- बाबा मिस्त्री – सोलापूर शहर मध्य
- रवींद्र धंगेकर – कसबा पेठ
- जितेंद्र मोघे - आर्णी
- दृश्यांत किशन - आमगाव
- महेंद्र घरात - उरण
- आसिफ अहमद झकारिया – वांद्रे पश्चिम
- असलं शेख - मालाड पश्चिम
काँग्रेसने या निवडणुकीत अनुभवी आणि लोकप्रिय नेत्यांना प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. नाना पटोले आणि प्रितीविराज चव्हाण यांसारख्या नेत्यांच्या निवडीमुळे पक्षाची रणनिती स्पष्ट होते. विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या सहभागामुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची पकड बळकट होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या या यादीतून युवा नेतृत्वालाही महत्त्व दिले गेले आहे. रुतुराज पाटील आणि अमित देशमुख यांना संधी दिल्याने नव्या पिढीच्या नेतृत्वाला राजकीय व्यासपीठावर ठामपणे उभे करण्याचा पक्षाचा इरादा स्पष्ट झाला आहे.
काँग्रेसच्या या घोषणेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस मजबूत आव्हान निर्माण करणार, असे संकेत या यादीतून मिळत आहेत. इतर पक्षांकडूनही उमेदवारांच्या नावांची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, येणाऱ्या काही दिवसांत प्रचारात अधिक चुरस निर्माण होणार आहे.
काँग्रेसने २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. नाना पटोले, विजय वडेट्टीवार, प्रितीविराज चव्हाण, आणि बाळासाहेब थोरात यांसारख्या नेत्यांना संधी देत पक्षाने प्रबळ नेतृत्वावर भर दिला आहे.
#Mahawani #veerpunekar #Chandrapur #rajura #korpana #MahawaniNews #congress #MaharashtraElections #assemblyCandidates #NanaPatole #PrithvirajChavan #BalasahebThorat #CongressCandidatesList #AssemblyElectionsCandidates