गुप्ता कोल वॉशरीज कंपनीसमोर कामगारांचे बेमुदत साखळी उपोषण.

Mahawani

जुन्या कामगारांना कंपनीत सामावून घेण्या करीता महा मिनरल मायनिंग बेनिफिशेशन कंपनीसमोर आंदोलन !

  • महावाणी - विर पुणेकर
  • ०५ ऑगस्ट २०२४

राजुरा : गुप्ता कोल वॉशरिज कंपनी मध्ये काम करणाऱ्या जुन्या कामगारांना त्याच जागी सुरू केलेल्या नवीन महा मिनरल बेनिफिशीएशन कंपनीने ( Maha Mineral Beneficiation Company ) जुन्या कामगारांना कंपनीतर्फे नोकरीत सामावून घ्यावे या प्रमुख मागणीसाठी सास्ती युनिट मधील कोल वॉशरिज कंपनी समोर जुन्या कामगारांनी सोमवारी सकाळी १० वाजता पासून कोल वॉशरीज कामगार संघटनेचे महासचिव रवी वाढई ( ravi vadhai ) यांचे नेतृत्वात साखळी उपोषण सुरू केले आहे.


राजुरा तालुक्यातील गुप्ता ग्लोबल रिसोर्सस प्रा.लि. ही कोल वॉशरिज कंपनी काही कारणामुळे २०१३ साली बंद करण्यात आली. त्यावेळी तत्कालिन कामगार आयुक्त तथा कामगार संघटनेमध्ये करार झाल्यानुसार भविष्यात कंपनी सुरू झाल्यास जुन्या कामगारांना परत कंपनीत कामावर घेण्यात येईल. असे सांगण्यात आले होते. मात्र त्याच ठिकाणी आलेल्या महा मिनरल बेनिफिशीएल कंपनी व्यवस्थापनाने जुन्या कामगारांना कामावर न घेता बाहेरील कामगारांना घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. 


त्यामुळे नवीन कोलवॉशरीज कंपनीच्या अन्यायकारक धोरणाला कंटाळून कोल वॉशरीज कामगार संघटनेचे महासचिव रवी वाढई यांचे नेतृत्वात सोमवारी सकाळी १० वाजता पासून महा मिनरल बेनिफिसीएल कंपनी समोर जुन्या कामगारांनी साखरी उपोषण सुरू केले आहे.


यामध्ये विनोद साळवे, रवी आसुटकर, भाऊराव पेरकंडे, शत्रुघ्न कायडींगे, शत्रुघ्न पेटकर, संजय गोरे, सचिन नळे अमृत दुर्गे, संदीप वाघे, महादेव पेरकंडे, किशोर अडवे, देविदास गाडगे आदी कामगार उपस्थित होते. यावेळी संयुक्त खदान मजदुर संघ (आयटक) युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली. ( mahawani ) ( rajura ) ( gupta coal woshri )


To Top