Farmers' Justice Yatra begins | शेतकरी न्याय यात्रेला प्रारंभ

Mahawani


शेतकऱ्यांच्या न्यायासाठी संघर्षाची सुरवात


  • महावाणी - विर पुणेकर
  • ०९ ऑगस्ट २०२४

वणी/झरी : शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगार युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित शेतकरी न्याय यात्रेला आज, ९ ऑगस्टला दुपारी १२ वाजता वनोजा Vanoja ) देवी येथील जनामाय-कासामाय देवस्थानातून शुभारंभ करण्यात आला. या यात्रेच्या सुरुवातीला माजी आमदार वामनराव कासावार Former MLA Vamanrao Kasawar ), माजी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र ठाकरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक टिकराम कोंगरे, ॲड. देविदास काळे, संजय खाडे, अरुणाताई खंडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीने यात्रा सुरू झाली. ( wani )


शेतकरी न्याय यात्रेचे नेतृत्व झरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि या यात्रेचे मुख्य संयोजक आशीष भाऊ खुलसंगे ( Ashish Khulsange ) यांनी पक्षाचा झेंडा उंचावून यात्रेचा शुभारंभ केला. यात्रा वनोजा देवी, हिवरे, शिवणी, कांडा, चनोडा, चोपण, मार्डी, खैरगांव या गावांतून प्रवास करत दापोरा येथे पहिल्या दिवसाचा समारोप झाला.


ही यात्रा ९ ऑगस्टपासून २१ ऑगस्टपर्यंत मारेगाव, झरी, आणि वणी या तीन तालुक्यांतून जाणार आहे. शेतकरी न्याय यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, कृषि साहित्यावरील जीएसटी रद्द, ६० वर्षावरील शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पेंशन, जातीनिहाय जनगणना, मालेगांव, झरी, आणि वणी तालुक्यातील पांदणरस्ते तयार करणे, तसेच पिकाला उत्पन्नाच्या खर्चानुसार हमीभाव देणे यांसारख्या महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात येणार आहेत. ( Beginning of struggle for farmers' justice )


यात्रेच्या पहिल्या दिवसाला हजारो शेतकरी, शेतमजूर, आणि युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुख्य संयोजक आशीष भाऊ खुलसंगे यांनी या यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात्रा २२ ऑगस्टला वणी शहरात समारोपाच्या कार्यक्रमासह समाप्त होईल. ( mahawani ) https://www.facebook.com/Mahawanee

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top