कोरपना तालुक्यातील १३ सामूहिक वनहक्क आराखड्यांना लवकरच मंजुरी #forestrights #korpana

 

वन हक्क व्यवस्थापन समिती, तालुकास्तरीय कन्व्हर्जन्स समितीची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
११ जुलै २०२४

राजुरा : कोरपना तालुक्यात एकूण १३ गावांना सामूहिक वन हक्क मिळाले असून त्यापैकी ८ गावांचे आराखडे टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई ने तयार केलेले असून उर्वरित ५ गावांचे आराखडे बाकी आहे. याच उद्देशाने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर च्या वतीने पंचायत समिती कोरपना येथे ग्राम स्तरीय वन हक्क व्यवस्थापन समिती, तालुकास्तरीय कन्व्हर्जन्स समितीची एक दिवसीय कार्यशाळा बुधवारी पार पडली.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आपल्या मार्गदर्शन पर कार्यक्रमात बोलत होते.यावेळी त्यांनी सर्व विभागाच्या योजना या आराखड्यात समाविष्ट करून त्या गावांना प्राधान्य देऊन कामे घ्यावे असे आदेश दिलेत. पेसा ५% अबंध निधी, ठक्कर बाप्पा इ. चा निधी प्राथमिकतेने या गावात खर्च करावा असे सांगितले. यावेळी नायब तहसीलदार चिडे यांनी विविध विभागाने समन्वयाने काम करून उर्वरित आराखडे लवकरात लवकर पूर्ण करावे असे निर्देश दिले. लवकरच तयार झालेले आराखडे चर्चेतील सूचना समाविष्ट करून जिल्हा कन्व्हर्जन्स समिती कडे मंजूरी करिता पाठविले जाईल असे कार्यशाळेत ठरविण्यात आले. ( Approval of 13 collective forest rights plans in Korpana taluka soon )

या कार्यशाळेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी पौंड, के.एफ.कुळमेथे, प्रशिक्षक म्हणून टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई चे संशोधन अधिकारी अमोल कुकडे, जगदीश डोळसकर, हिमानी लोंढे, नितीन ठाकरे, प्रवेश सुटे, तसेच जिल्हा व्यवस्थापक स्नेहा ददगाळ तालुका वनहक्क व्यवस्थापक मनोज पाटील, रजनी घुगरे, वैष्णवी चौधरीकर, एफ ई एस संस्थेचे अनिल चांदेवार, संतोष पंडित, सुषमा पोटे, प्रकाश काळे,ग्रामसभा प्रतिनिधी भारत कन्नाके,विमल कुळमेथे ,वनविभाग, सार्वजनिक बांधकाम, कृषी, पशुसंवर्धन, लघुपाटबंधारे, नरेगा,विभागाचे कर्मचारी,सामूहिक व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. ( mahawani ) ( rajura ) ( korpana )

To Top