Firing in Rajura | राजूरात पुन्हा गोळीबार एकाचा जागीच मृत्यू

Mahawani
1 minute read
0

चंद्रपूर, स्थानिक गुन्हे शाखेकडून राजूरा येथिल गोळीबार हत्याकांडाचे आरोपी ताब्यात.

  • महावाणी - विर पुणेकर 
  • २४ जुलै २०२४

राजुरा। काल २३ जुलै रोजी महाराष्ट्र बँक समोर गोळीबार करण्यात आला. गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला असून गोळीबार करून आरोपी पसार. सदर गोळीबाराने राजुरा दहशत माजली आहे. सदर हत्याकांड हा जुन्या सूडापोटी  करण्यात आल्याचे बोलले जात आहे.


मागील एक वर्ष पूर्वी सोमनाथपूर वार्ड येथेल रहिवासी लल्ली शेरगील याचे वरबंदुकीच्या गोळ्या झाडून प्राणघात हल्या करण्यात आला त्या हल्ल्यात एका निष्पाप महिलेचा जीव गेला होता आणि लल्ली शेरगील हा गंभीर जखमी झाला होता. त्याच हल्ल्याचा सूड म्हणून लल्ली शेरगील आणि  शगीर उर्फ मोनू कदिर शेख ( Shagir aka Monu Qadir Shaikh ) यांनी काल २३ जुलै रोजी सायंकाळी ०७ : ०० वाजताच्या सुमारास महाराष्ट्र बँक समोर, पंचायतसमीती चौक राजूरा येथे मयत शिवज्योत सिंह देवल याचा पाठलाग करत ओम जनरल स्टोरे च्या आत जाऊन गोळीबार केला यात शिवज्योत सिंह देवल ( Shivjyot Singh Dewal ) जागीच ठार झाल्याचे पाहता मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले.


मयत शिवज्योत सिंह देवल हा नवज्योत सिंह देवल चा मोठा भाऊ होता. नवज्योत सिंह देवल Navjot Singh Dewal ) हा मागील सोमनाथपूर वॉर्ड येथील गोळीबार हत्याकांडाचा आरोपी आहे.


सदर गोळीबार घटनेचे गांभिर्य ओळखुन मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु हे तात्काळ घटनास्थळी पोहचुन स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, राजूरा पोलीस स्टेशन व उपविभाग राजूरा येथिल अधिकरी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना हत्यारासह ताब्यात घेण्यात आले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास राजूरा पोलीस स्टेशन करित आहे. 


#mahawani #rajura #murder #mahapolice

Tags

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top