चंद्रपूर व नाशिक येथील बॉम्ब शोधक पथकाला पाचारण.
- महावाणी : विर पुणेकर
- ३० जुलै २०२४
गडचांदूर। आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गडचांदूर येथील बस स्थानक परिसरात भगवती यन. एक्स कापड दुकानाच्या समोरील आवारात एका निळ्या पिशवीत सदृश्य बॉम्ब ठेवलेला आढळला. या माहितीने संपूर्ण गडचांदूर शहरात खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पिशवीवर झडती घेतली. प्रारंभिक तपासानुसार, पिशवीत बॉम्ब आहे का नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. या संदर्भात चंद्रपूर, नाशिक, आणि गडचिरोली येथील बॉम्ब शोधक विभागाला त्वरित पाचारण करण्यात आले आहे.
माननीय चंद्रपूर पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन, गडचांदूर पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी कदम, आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले असून तपासाच्या वेळी समजले की, पिशवीत ठेवलेला बॉम्ब हा खोटा असून, कापड दुकानदाराला भीती दाखवण्यासाठी फसवणुकीच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे.
भारतीय दंड संहितेच्या कलम ५०८ (फसवणूक किंवा भीती दाखवण्याचा अपराध) आणि कलम १५२ (सार्वजनिक स्थळी लोकांना भिती दाखवणे) अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींना गजाआड करण्यात आले असून, गडचांदूर पोलीस या प्रकरणाची तपासणी करत आहेत. पुढील तपासाच्या आधारे, घटनाची खरी स्थिती स्पष्ट होईल आणि संबंधित आरोपींविरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
#gadchandur #chandrapur #rajura #bomb #crime #mhpolice #BhagwatiTextileShop