जलरोधक पेंडालची उभारणी करून सदरची चाचणी घेण्यात येत आहे.
२८ जून २०२४
चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया ही दिनांक १९/०६/२०२४ जिल्हा किडा संकुल, चंद्रपूर येथे सुरु झाली असुन उमेदवारांना खालील सोयी सुविधा पुरविण्यात येत आहे.
पोलीस भरती प्रक्रिया मध्ये घेण्यात येणारे १०० मिटर धावणे, १६०० मिटर धावणे ही मैदानी चाचणी जिल्हा किडा संकुलच्या सिन्थेटिक रॅनिंगट्रॅक वर घेण्यात येत आहे. उण आणि पावसाळयापासुन बचाव करीता तसेच उमेदवारांना पाऊसपाणी आणि उष्णतेचा त्रास होवू नये म्हणुन रॅनिंगट्रॅक वर १५० मिटर लांब आणि २२ फुट रुंद आणि १५ फुट उंचीचा वॉटरप्रुफ / मजबुत पेंडालची उभारणी करण्यात आली असुन यात सदरची चाचणी घेण्यात येत आहे. ( The trial peace is coming by erecting a waterproof pendal )
• गोळाफेक मैदान सुध्दा वॉटरप्रुफ पेंडालने कव्हर करण्यात आले आहे.
• शक्यतो सदरची मैदानी चाचणी पहाटे-पहाटे उण निघण्यापूर्वी पुर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न सुरु आहे.
• १०० मिटर व १६०० मिटर मैदानी चाचणी पूर्व उमेदवारांना तो चाचणी करु शकतो काय याबाबत विचारणा करुनच चाचणी घेण्यात येत आहे.
• सिन्थेटिक ट्रॅक असल्यामुळे ज्या उमेदवारांकडे पायात शुज नाही अशा उमेदवारांना रॅनिंग करीता विभागामार्फत शुज पुरविण्यात येत आहे.
• उमेदवारांकरीता मैदानावर इलेक्ट्रॉल पावडर, थंड पाण्याची कॅन, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय टिम ठेवण्यात आले आहे.
• उमेदवारांना सशुल्क बिस्कीट व केळीची सुविधा देखील पुरविण्यात येत आहे.
• उमेदवारांच्या बॅग/कागदपत्र ठेवण्यासाठी सुध्दा वॉटरप्रुफ शेड व टोकन सुविधा ठेवण्यात आली आहे.
• उमेदवारांकरीता पोलीस बॅरक, पोलीस फुटबॉल ग्राउन्ड जवळ, तुकूम चंद्रपूर तसेच पोलीस ड्रिलशेड, पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे थांबण्याची सोय करण्यात आली असुन सदर ठिकाणी अतिरिक्त प्रसाधनगृह (मोबाईल टॉयलेट) ची सुध्दा व्यवस्था करण्यात आलेली आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती करीता असलेले उमेदवारांना उष्णतेचा व पावसाचा त्रास होवू नये यासाठी योग्य ती काळजी घेवुन सदरची पोलीस भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. ( SP chandrapur ) ( mahawani ) ( chandrapur police bharti )