उष्माघाताने मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास आर्थिक सहाय्यता.

 

स्थानिक सरपंचाने मृतकाच्या परिवाराला मदती करीता केली होती विनंती.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
०२ जून २०२४

चंद्रपूर/दुर्गापूर : काल ०१ जून रोजी पद्मापुर निवासी धनराज गेडाम ( dhanraj  gedam ) यांचा उष्मघाताने मृत्यु झाला. घरातील कमवता व्यक्ती गेल्याने गेडाम परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. धनराज गेडाम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार असून गेडाम कुटुंबाची परिस्तिथी अत्यंत हालाकीची असल्याने यांच्या परिवाराला मदती करीता स्थानिक सरपंचाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव विजय नळे ( vijay nale ) यांना विनंती असता नळे यांनी काही क्षणात सांत्वन भेट देऊन सहाय्यता प्रदान केली. ( Person dies due to heatstroke in Chandrapur )

        पद्मापुर निवासी धनराज हा आपल्या परिवाराचा कमाईपुत होता. गावात मनमिळावू आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने त्याच्या मृत्यु ने संपुर्ण गाव हळहळला आहे. स्थानिक सरपंचा सौ. अलोणे मॅडम यांचे पती श्री. शैलेश अलोने ( shailesh alone ) यांनी गेडाम परिवाराच्या मदतीसाठी काँग्रेस प्रदेश सचिव विजय नळे यांना साकडे घातले होते. नळे यांना सदर बाब कळताच गेडाम परिवाराची भेट घेतली व मदतीची रक्कम मृतक धनराज च्या पत्नीला स्वाधीन केली. शासकीय मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मृतकाच्या परिवाराला नळे यांनी या शनी दिली आहे. 

          या क्षनि नळे यांचे सहकारी, पद्मापुर गावकरी व गेडाम यांचे परिजन उपस्थित होते. ( mahawani ) ( chandrapur ) ( padamapur ) ( durgapur )

To Top