तलाठी भरती च्या निवड यादीतील संशयित उमेदवारांची चौकशी करा. #Tribal-tiger-army


जिल्हाधिकारी यांना आदिवासी टायगर सेनेची मांग.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२० जून २०२४

राजुरा : तलाठी भरतीच्या अंतिम निवड यादीतील अनुसूचित जमाती ( Scheduled Tribes ) प्रवर्गातील संशियत उमेदवारांची चौकशी करण्याची मांग आदिवासी टायगर सेना, चंद्रपूरच्या वतीने मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या अंतर्गत सन- २०२३ या वर्षात तलाठी भरती राबविण्यात आली होती. सदर तलाठी भरतीच्या अंतिम निवड यादी मद्ये नाम सदृष्याशा फायदा उचलून अनुसुचीत जमातीच्या प्रवर्गातून काही गैर आदिवासी उमेदवार लाभ घेत असल्याचे निदर्शनात येत आहे. 

        करीता सर्व पात्र उमेदवाराच्या जात वैध्यता प्रमाणपत्राची काटेकोर पने चौकशी करण्यात यावी व मूळ आदिवासी उमेदवारास न्याय देण्याची मागणी आज आदिवासी टायगर सेनेचे ( Tribal Tiger Army ) विदर्भ अध्यक्ष ऍड. संतोष कुळमेथे ( Adv. Santosh Kulmethe )विदर्भ महासचिव ऍड जितेश कुळमेथे, प्रा. हितेश मडावी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, माजी सैनिक ड्रेफूल आत्राम जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी चंद्रपूर ह्यांना निवेदनात्मक मागणी करण्यात आली आहे.  ( mahawani ) ( Rajura ) ( chandrapur )

To Top