उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे जागतिक परिचारिका दिन उत्साहात.
१४ मे २०२४
राजुरा : उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे इंफंट जिजस सोसायटी व्दारा संचालित कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग राजुरा आणि कल्याण इंस्टिट्यूंट आँफ नर्सिंग एज्युकेशन राजुरा (पोस्ट बी. एस. सी. नर्सिंग, बी. एस. सी नर्सिंग, जी. एन. एम व ए. एन. एम) च्या वतीने जागतीक परिचारिका दिन (World Nurses Day) उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय राजुरा चे मुख्य वैद्यकिय अधिक्षक डाॅ. अशोक जाधव (Chief Medical Superintendent Dr. Ashok Jadhav), रुग्णालयाचे मेट्रन सरला ढोमणे, इन्फंट संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष शिंदे यांच्या हस्ते राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कार्यरत नर्सेस यांना स्मृती चिन्ह तथा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, उपजिल्हा रुग्णालयाचे डाॅक्टर, परिचारिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. (mahawani) (rajura)