२५ वर्षांनी दिला शाळेत जगलेल्या दिवसांना उजाळा.

 

छोटुभाई पटेल हायस्कुल, चंद्रपूर येथे माजी विद्यार्थ्यांच्यावतीने "दिवस शाळेचे क्षण रौप्य महोत्सवाचे" कार्यक्रम आयोजित


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२९ मे २०२४

चंद्रपूर : छोटुभाई पटेल हायस्कुल चंद्रपूर येथील  वर्ष १९९९ मधिल १० विच्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने रविवार २६ मे ला "दिवस शाळेचे क्षण रौप्य महोत्सवाचे" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दीष्ट  शाळेत जगलेल्या दिवसांना पुन्हा उजाळा देण्याचा होता. शाळेतील ते सोनेरी दिवस, आठवणीतील क्षणांना परत उजाळा देण्यात आला.

        सर्वप्रथम माजी विद्यार्थ्यांंनी शाळेत हजेरी लावली. आपल्या जुन्या वर्गात जाऊन त्यांच्या जीवनातील निर्णायक टप्पा ठरलेल्या त्या क्षणांची आठवण केली. शाळेत आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी भावूक झाले होते. शाळेतील आठवणींच्या दिवसांनी अनेकांचे डोळे पाणावले होते. या ह्दयस्पर्शी क्षणांचे साक्षीदार बनले. सकाळी  अकरा वा . चंद्रपुरातील एका नामांकित हाॕटेलमध्ये कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरूवातीला प्रत्येकाँनी आपआपला परिचय दिला. काही उच्चपदावर गेलीत तर  काहींनी छोटासा व्यवसाय थाटला. क्षेत्र कोणतेही असो प्रत्येक जण आज खूप आनंदीत दिसत होते. यादरम्यान धिरज साळुंके (dhiraj salunkhe) यांनी शाळेला उद्देशून लिहीलेले पत्राचे वाचन करण्यात आले. या पत्रातून शाळेतील दिवसांना पुन्हा जिवंत करण्याचा  त्यांचा प्रयत्न चांगलाच यशस्वी झाला. या पत्रावर अनेकांनी कौतुकाची दाद दिली. त्यानंतर संगीत खूर्ची, निंबु चमचा यासारखे कार्यक्रम आयोजित कराण्यात आले. दुपारी जेवणाचा कार्यक्रम झाला. 

        दुपारी चार वाजता शिक्षकांचे आगमन झाले. त्यांच्या आगमनानंतर दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर प्रत्येक शिक्षकांचे मनोगत झाले. यात परिहार मॅडम, वैद्य मॅडम, कुंभरे मॅडम, जेष्ट् निवृत्ती शिक्षक जवादे सर, ढेंगळे सर, गर्गेलवार सर, शर्मा सर, मानकर सर,  निबांळकर सर, आबोजवार सर, बारापात्रे सर यांनी मार्गदर्शन केले.   धिरज साळुंके यांनी पठाण सरांच्या स्मरणार्थ लिहिलेल्या पत्राद्वारे उपस्थितांची डोळे पाणावले. या कार्यक्रमात दिवंगत मित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आणि केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

    या धकाधुकीच्या काळात सर्वच आपआपल्या क्षेत्रात व्यस्त आहेत. तुम्हांला पैसा खूप कमिवता येतो. तुम्ही अंबानीपेक्षा श्रीमंत व्हाल पण आनंद हा विकत घेता येत नाही. आनंद मिळवीण्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. अशीच प्रतिक्रिया प्रत्येकाच्या मनात व्यक्त होत होती.

        या कार्यक्रमासाठी अभिषेक आचार्य,  चंद्रकांत कोतपल्लीवार, जितेंद्र मशारकर, धिरज साळुंके, पराग जवळे, श्याम कोंतमवार, वर्षा सेलोटे, सागर कुंदोजवार, कृणाल पद्मगिरीवार, अजय फुलझेले, चेतन पाटील,  आदींनी विशेष परिश्रम घेतले. (mahawani) (chandrapur)

To Top