अखेर डम्पिंग मधेच मिळाला सोहेलचा मूर्तदेह.

 

वेकोलि प्रशासनावर सोहेलच्या घरच्यांचा रोष.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२९ मे २०२४

राजुरा/सास्ती : मागील चार दिवसापासून वेकोलि सामान्य कामगार पदावर असलेला सोहेल खान (Sohail Khan) वेकोलि सास्ती खुली खदान क्षेत्रातून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह काल २८ मे रोजी दुपार ०१:३० च्या सुमारास घटनास्थळावरून (वेकोलि डम्पिंग क्षेत्रातून) मिळाल्याने सोहेलच्या परिवारावर दुःखाचे ढोगर कोसळले आहे.

    माध्यमात सोहेलचे चोरट्याने अपहरण केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होता. परंतु सोहेलचा मृतदेह वेकोलि क्षेत्रातच मिळाल्याने सोहेलच्या परिवाराकडून वेकोलि प्रशासनावर हलगर्जी पणा केला असल्याच्या आरोपाचे बाण ताणले जात आहे. सोहेलच्या परिवाराकडून सोहेल ज्या वेकोलि क्षेत्रात दस्त घालण्या करीता गेला होता त्याच जागी डम्पिंग मध्ये त्याचा शोध घेण्याची मांग बेपत्ता झाल्यापासून होत होती.

    परंतु माध्यमात प्रसारित झालेल्या बातम्याने प्रशासनाचे व शोध पथकाचे लक्ष वेगळ्या दिशेने वेधल्या गेले व माध्यमात प्रसारित झालेल्या बातम्या कडे जास्त लक्ष न देता प्रशासनाने व शोध पथकाने घटनास्थळी ४ दिवसा आधीच जातीने शोध घेतला असता तर सोहेल त्याच रात्रौ भेटला असता.

    सोहेलच्या परिजनाने व पत्नीने संबंधित वेकोलि क्षेत्राचे काम आंदोलन करून बंद पाडल्याने शोध मोहिमेला वेग आला व सोहेलचा शोध लागला. अन्यथा वेकोलि प्रशासनाने उडवा-उडवीचे उत्तर देत थातुर-मातुर शोध मोहीम सुरु ठेवली असती असे आरोप वेकोलि प्रशासनावर सोहेलच्या पारिजानातून केले जात आहे.

    सोहेल वेकोलि सामान्य कामगार पदावर असून त्याला सुरक्षा रक्षक म्हणून सुरक्षा रक्षक प्रभारी शेखर भारती यांनी सोहेल खानला सुरक्षा रक्षक या पदाची कुठलीहि माहिती व प्रशिक्षण नसतांना सुरक्षा उपकरना विना खुल्या खदानीत दस्त घालण्या करीता कसे काय पाठवले असे सोहेलच्या परिजनातून वेकोलीला प्रश्न विचारले जात आहे.

    काल २८ मे रोजी लेखी स्वरूपात वेकोलिने तात्काळ आर्थिक मदत म्हणून सोहेलच्या परिवाराला १५ लाख आणि सोहेलच्या पत्नीला एका महिन्याच्या आत नोकरीत रुजू करण्याचे वेकोलिने कालच्या मिटिंग मध्ये मान्य केले आहे.

     सदरील तपास वेकोली महाव्यवस्थापक व राजुरा पोलीस निरीक्षक श्री. योगेश्वर पारधी यांच्या नेतृतवाखालील करण्यात आला. 

    सोहेलचा काल रात्रौ ०८:०० वा शवविच्छेदन नंतर बल्लारपूर येथे अंतविधी करण्यात आला. (mahawani) (rajura) (ballarpur) (sasti) (wcl) 

  • वेकोली प्रशासन आपली फाटली चादर शिवण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे, सोहेल खान प्रकरणात वेकोली अधिकाऱ्यांनी लोकांची दिशाभूल करत आपली चूक लपवत कर्मचाऱ्यांचा जीवाशी खेळताना दिसत आहे. - श्री. रविकुमार पुप्पलवार, आप शहर अध्यक्ष, बल्लारपूर 
  • माध्यमांना वेकोलि प्रशासनाने संभ्रमास्पद माहिती देऊन सदर प्रकरणात दिशाभूल करण्याचे काम केले आहे. -  मुशरर्फ हुसेन, सोहेल खान, नातेवाईक 

To Top