कार्यकर्त्याच्या प्रतिक्रियेने प्रस्थापित नेत्यांच्या मनात धसकी.

Mahawani

फोडा फोडीच्या राजकारणाला आमचे समर्थन नाही -सुरज ठाकरे

Suraj Thakre
संग्रहित छायाचित्र

  • महावाणी : विरेंद्र पुणेकर
  • ०१ एप्रिल २०२४

राजुरा। ३० मार्च रोजी इंडिया अलायन्स तथा महाविकास आघाडीची भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या (Indian National Congress) अधिकृत उमेदवार श्रीमती. प्रतिभाताई सुरेश (बाळू) धानोरकर (Smt. Pratibhatai Suresh Dhanorkar) यांच्या प्रचारार्थ ओमसाई मंगल कार्यालय राजुरा येथे कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत इंडिया अलायन्स तथा महाविकास आघाडी चे पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


बैठकीत काँग्रेस च्या समर्थनाथ प्रचाराकरता सुरज ठाकरे यांना राजुरा येथील इंडिया अलायन्स तथा महाविकास आघाडी बैठकीच्या मंचावर पाहून सर्व सामान्य व खेड्यापाड्यांतील लोकांना मोठा आनंद झाला असून सध्या आम आदमी पक्ष्याच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी असलेले सुरज ठाकरे (Suraj Thackeray Chandrapur District Vice President of Aam Aadmi Party) यांनी तळा गळात जाऊन सर्व सामान्य नागरिकांकरिता केलेल्या कामाने नागरिकात त्यांच्या प्रति सकारात्मक भूमिका असल्याने त्यांनी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षात येत काम करावे असे सामान्य काँग्रेस कार्यकर्त्या कडून प्रतिकिया दर्शवली जात असल्याने हे प्रस्थापित नेत्यांना धसकी भरविणारी आहे.


सद्य होत असलेल्या फोडा फोडीच्या राजकारणात जनतेच्या मनातून नेत्यानं प्रति निष्ठावान पणा संपल्याचे दिसत आहे. आज सत्ताधारी पक्ष विविध संस्थेच्या साहाय्याने पक्षा पक्षात फूट पाडून नेत्यांना आपल्या सोबत सामावून घेतले जात आहे. याने जनतेच्या मनात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कि, कोणता नेता केव्हा कुठल्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेचा कौल कुणाकडे असणार हे आपल्याला निकाला नंतरच पाहायला मिळणार असून चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभेला उभे असलेले दोन मोठे पक्ष भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) तसेच भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या उमेदवारांनी प्रचाराला मोठ्या जोमाने सुरवात केली आहे.


तसेच सर्व मित्र पक्षाने आप आपल्या ताकदीने आपल्या मित्र पक्षाच्या प्रचाराला मोठ्या जोमाने सुरवात केली असून काही पक्षात मोठ्या संख्येने पक्ष प्रवेशहि होत आहे तर काही पक्षात प्रचाराची रूपरेषा आखत मोठं मोठ्या बैठकी घेतल्या जात आहे. (mahawani) (rajura) (loksabha 2024)

  • मी आहे तिथेच कायम - सुरज ठाकरेजिल्हा उपाध्यक्ष, आम आदमी पार्टी

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top