चंद्रपूर जिल्हा नवनियुक्त शिवसेना संपर्क प्रमुख किशोरजी रॉय यांची लोकसभा निवडणुकी संदर्भात आढावा बैठक.

Mahawani

 

महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट


महावाणी - विरेंद्र पुणेकर 
०१ एप्रिल २०२४

चंद्रपुर : हॉटेल सिद्धार्थ, चंद्रपूर येथे ३१ मार्च रोजी चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चंद्रपूर जिल्हा नवनियुक्त शिवसेना संपर्क प्रमुख किशोरजी रॉय (Chandrapur Shiv Sena contact chief Kishoreji Roy) यांनी आढावा बैठक बोलवली होती. बैठकीत आगामी लोकसभा निवडणुक प्रचारा संधर्भात माहिती व रूपरेषा ठरवण्यात आली. तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. (Chandrapur-Vani-Arni Lok Sabha)

        याप्रसंगी शिवसेनेचे नागपूर विभागीय कार्यालय सचिव प्रफुलजी मानमोळे (Prafulji Manmole), काटोल विधानसभा संघटक रितेश हेलोंडे पाटिल, नवनियुक्त जिल्हा संघटक युवराजजी धानोरकर (Yuvrajji Dhanorkar), शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बंडूभाऊ हजारे (Bandubhau Hazare), नितीनजी मत्त्ते, महिला जिल्हाप्रमुख मीनलताई आत्राम, प्रतिभाताई ठाकूर, युवासेना जिल्हाप्रमुख विनोद बूटले, शिवसेना भारतीय कामगार संघटना चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी (Chandrapur Taluka Chief Santosh Parkhi), महानगर प्रमुख भरत गुप्ता, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा प्रमुख तथा बल्लारपुर तालुका प्रमुख जमीलभाई शेख व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. (Shiv Sena's review meeting regarding the Lok Sabha elections)

        यावेळी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा महायुतीचे (mahayuti) उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार (Sudhir Bhau Mungantiwar) यांना निवडणुकीत प्रचंड मताने निवडून आणन्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम ठरविण्यात आला. तसेच शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या कामाला जोमाला लागावे असे निर्देश जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना संपर्कप्रमुख किशोरजी रॉय यांनी देत मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट घेऊन जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांणी सुधीरभाऊंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (mahawani) (chandrapur) (mahayuti) (bjp) (loksabha2024)

To Top