घराशेजारी खेळताना ७ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा प्राणघात हल्ला.


शहरात वन्य प्राण्यांचा सतत हैदोस,  वनमंत्री, प्रशासन गप्प ? -रविभाऊ पुप्पलवार आप, शहराध्यक्ष

महावाणी - विरेंद्र पुणेकर
१४ मार्च २०२४

बल्लारपूर : शहरात सतत मागील काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा हैदोस सुरू असून पुन्हा काल १३ मार्च रोजी वन्य प्राण्याकडून पंडित दिनदयाल वार्डातील (Pandit Dindayal Ward) ७ वर्षीय चिमुकली साफिया इकबाल शेख (Safia Iqbal Shaikh) घराशेजारी खेळत असताना बिबट्याने हल्ला चळवल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार (Aam Aadmi Party city president Ravibhau Puppalwar) मिळताच यांनी चिमुकलीच्या कुटूंबाची भेट घेतली. दोन दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने पेपरमिल बांबू स्टाॅक यार्ड क्षेत्रात वाढत्या वन्यप्राण्यांचा वावरावर उपाययोजना करीता उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले होते. (Peppermill Bamboo Stock Yard)

    सदर स्टाॅक यार्डमध्ये (Stock yard) वन्यप्राणी आसरा घेत शहरातील नागरिकांवर हल्ले चळवत आहेत. यावर स्थानिक आमदार ज्यांच्यावर वनमंत्री (Forest Minister) पदाची जबाबदारी असून ते गप्प आहेत? यावर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना का केले जात नाही? अजून केव्हा पर्यंत नागरिकांचा जीव अश्या प्रकारे वन्यप्राण्यांमुळे धोक्यात राहिल असा प्रश्न रविभाऊ पुप्पलवार यांनी उपस्थित केला.

(mahawani) (ballarpur) (aap) (chandrapur)



To Top