वंचितचा प्रस्ताव काँग्रेसला मान्य पवार व ठाकरे गट बाळासाहेबांची मनधरणी करतील काय?


महाविकास आघाडीच्या भूमिके संधर्भात संध्याकाळ पारियात शेवटचा निर्णय



महावाणी - विरेंद्र पुणेकर
२६ मार्च २०२४

मुंबई : लोकसभा निवडणूका जाहीर झाल्या पासून प्रत्येक राजकीय पक्षात जुडवा जुववीचे राजकारण पाहायला मिळत आहे. यातच महा विकास आघाडी कडून वंचितला ४ जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता परंतु वंचितने तो प्रस्ताव नाकारून स्वबळावर लढणार असे पत्रकार परिषदेत सांगितले होते आणि येत्या २७ तारखेला नामांकन अर्ज दाखल करणार आहे असे हि वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. याने महाविकास आघाडीत कूज-बुजू सुरु झाल्याची चर्चा माध्यमातून समोर येत आहे. आज काँग्रेस चे प्रदेशा अध्यक्ष नाना पाटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले आहे कि, आम्हाला वंचित चा प्रस्ताव मान्य असून पवार व ठाकरे गटाने देखील मान्य करावा. सध्या पवार व ठाकरे गटाच्या भूमिके कळे वंचित समेत महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात वंचित ची ताकद पाहता वंचित स्वबळावर लढली तर नेमका नफा व तोटा कुणाला होणार ? हे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी चांगलेच ओळखले असून महाविकास आघाडी असो वा इतर हे वंचित ला सोबत घेण्या करीता आपले दोन पाऊल समोरच ठेवताना दिसत आहे. आज माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीच्या भूमिके संधर्भात संध्याकाळ पारियात शेवटचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले असून जर वंचित चा प्रस्ताव मानला गेला नाही तर वंचित "एकला चालो" चा मार्ग पथकारतील का किव्हा पुन्हा वंचित कडील काही पत्ते उघड वायचे बाकी आहे ?

शिवसेना ठाकरे, शरदचंद्र पवार गटात चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत असून दोन्ही गटाच्या चर्चेतून काय शेवटचा मार्ग निगतो या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तसेही वंचित ने स्पष्ट केले आहे कि शिवसेना ठाकरे आणि वंचित मध्ये युती राहिलेली नाही. मग आत्ता महाविकास आघाडी मध्ये वंचित शामिल होणार कि नाही हे आज संध्याकाळ परियंत स्पष्ट होणार असून उद्याचा सूर्य सर्व पक्षानं करीता कसा असेल हे आज संध्याकाळी स्पष्ट होणार आहे. (mahawani) (vanchit bahujan aghadi) (maha vikas aghadi) (mumbai) (loksabha 2024)


To Top