आप नेते सुरज ठाकरे याच्या मागणीला यश.

 

१ मार्च रोजी पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी, अवैध व्यावसायिकांवर आळा घालण्याकरीता विशेष प्रयत्न करावे असे केले होते पत्र !


महावाणी - विरेंद्र पुणेकर
०६ मार्च २४

चंद्रपुर/राजुरा : तालुक्यात वाढती गुन्हेगारी, अवैध रेती तस्करी, अवैध कोळस्याचे टाल समेत गैरकानूनी व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढण्याने राजुरा तालुक्यात सवंत्र अवैध व्यावसायाचा बोल-बाला होत आहे. तसेच सदर व्यवसायातून मिळवलेल्या भांडवलातून बेरोजगार युवकांना सदर अवैध व्यवसायात गुंतवून त्यांचे कुशल जीवन दूषित केले आहे. सदर अवैध व्यवसायामुळे राजुरा विभागात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ झाली असून गुंडप्रवृत्तीची भावना विभागातील युवकाच्या मनात झपाट्याने वाढत आहे हे मागील काळात झालेल्या हत्या, जीवघेणे हल्ले, यातून सिद्ध होते. मागील काळात राजुरा शांतीप्रिय क्षेत्र होते परंतु आज अवैध व्यावसायिकाने सदर क्षेत्र गुंड प्रवृत्तीने दूषित केल्याचे चित्र दिसून येत आहे. 

      असे आप नेते तथा जय भवानी कामगार संघटना, चंद्रपूर संस्थापक, अध्यक्ष मा. सुरज ठाकरे Suraj Thackeray यांनी आपल्या पत्रातून मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर श्री. मूम्माका सुदर्शन, तसेच वरीष्ठ अधीकारी व संबंधित विभागाला देत संबंधित शेत्रीय विभागतील पोलीस प्रशसनाला कदाचित निदर्शनात येत नसलेल्या बाबींकरीता पोलीस प्रशासनाने विशेष प्रयत्न करावे असे निवेदन १ मार्च रोजी दिले होते. Mummaka Sudarshan

      सदर पत्रा संधर्भात माध्यमाशी बोलतांना सुरज ठाकरे यांनी अवैध व्यवसायाला तात्काळ आळा न घातल्यास मी स्वतः सदर व्यवसायात भांडवल गुंतवत बेरोजगार युवकांना रोजगार मिडवून देईल असे वक्तव्य केल्याने चर्चेचा विषय होता. 

     सदर पत्राचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक यांनी चंद्रपूर, स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश देत पथक तयार करून रेती तस्कर, वाढती गुन्हेगारी, अवैध व्यावसाइकावर चागलीच मुठ बांधत होत असलेल्या अवैध व्यावसायिकांचे मुसके आवरल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. 

एकावर एक धडाकेबाज कारवाई पाहता मा. सुरज ठाकरे यांना, पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहे.

#mahawani #chandrapurpolice #crime #Illegalsaleofcoal #Illegaltobacco #Sandsmuggling

To Top